मास्टर दिनानाथ मंगेशकर महाविद्यालयात 17 वर्षांनी भरले माजी विद्यार्थ्यांचे कॉलेज
मुख्य संपादक द्रोणाचार्य कोळी
9822041174
निलंगा : मास्टर दिनानाथ मंगेशकर महाविद्यालय, औराद शहाजानी येथे दिनांक 26 ऑक्टोंबर रोजी 2007- 08 बॅचचे माजी विद्यार्थी' यांच्या वतीने नुकताच कॉलेज मध्ये अत्यंत उत्साहात 'गेट टुगेदर' (स्नेहसंमेलन) कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते.
कला शाखेच्या माजी विद्यार्थ्यांमध्ये तब्बल 17 वर्षांनी एकत्रित येऊन जुन्या आठवणींना उजाळा देण्यासाठी आणि आपसातील स्नेहसंबंध अधिक दृढ करण्यासाठी या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. या कार्यक्रमाला 40 पेक्षा अधिक सदस्यांनी माजी विद्यार्थी व प्राध्यापक यांनी उपस्थिती लावली.
यावेळी, गुरुजनांचा सत्कार, मनोगत, 'मनोरंजक खेळ', 'सांस्कृतिक कार्यक्रम', यांसारख्या विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले होते. उपस्थितांनी आपल्या जुन्या आठवणींना उजाळा देत आणि भविष्यातील वाटचालीवर चर्चा करत मनसोक्त आनंद लुटला.
कॉलेज चे प्रिन्सिपॉल डॉ कल्याणे सर, महेंद्र गिरी सर, गरुड सर, गोदरे सर, ढेबे सर यांनी या कार्यक्रमाच्या आयोजनाबद्दल समाधान व्यक्त केले आणि भविष्यातही असे उपक्रम आयोजित करत राहण्याचे आश्वासन दिले.
कार्यक्रमाच्या यशस्वी आयोजनात श्री पांडुरंग सगरे, ज्ञानेश्वर पाटील, विशाल बोंडगे, शिवाजी माने, महेश शिंदे, अरुणा मरगणे, पल्लवी बिरादार यांनी सक्रिय सहभाग घेतला.
कार्यक्रमाची सांगता सर्वांनी एकत्र भोजन घेऊन आणि एकमेकांना भविष्यातील वाटचालीस शुभेच्छा देऊन झाली.


0 Comments