शिक्षकांचा निरोप समारंभ अनं तपसे चिंचोलीच्या विद्यार्थ्यांना अश्रू अनावर...
मुख्य संपादक द्रोणाचार्य कोळी
9822041174
औसा: औसा तालुक्यातील तपसे चिंचोली जिल्हा परिषद शाळेतील शिक्षिका संतोषीमाता लोहार, अनुराधा कनामे , शिक्षक सिद्धेश्वर आयरेकर , प्रदीप इज्जपवार या चार शिक्षकांच्या शासन नियमाप्रमाणे बदल्या झाल्या. त्या निमित्ताने शाळेत सोमवारी दिनांक 29 सप्टेंबर रोजी निरोप समारंभाचा कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता.
याप्रसंगी सलग सात वर्ष सेवा करत असताना प्रत्येक कार्यक्रमातून विद्यार्थ्यांना प्रोत्साहित करण्याचे काम आणि सामाजिक एकोपा जपण्यासाठी सांस्कृतिक कार्याच्या माध्यमातून योग्य ते प्रयत्न शिक्षिका संतोषीमाता लोहार यांनी केले. उत्कृष्ट स्नेहसंमेलन, राख्या बनवण्याचा उपक्रम , सहल, नृत्य स्पर्धेसाठी विद्यार्थ्यांना तालुकास्तरीय पातळी गाठण्यासाठी अविरत प्रयत्न , सतत शाळेतील विद्यार्थ्यांना प्रोत्साहनपर अनोखे उपक्रम, गुणवत्ता टिकवून ठेवण्यासाठी विशेष करून शिक्षिका संतोषीमाता लोहार, अनुराधा कनामे आणि शिक्षक सिद्धेश्वर आयरेकर , प्रदीप इज्पवार या शिक्षकांनी अनेक अडचणीना सामोरे जाऊन प्रयत्न केल्याच्या कार्यास विद्यार्थांनी उजाळा दिला. याप्रसंगी सर्वांचे डोळे भरून आले.
याप्रसंगी कार्यक्रमाचे सूत्रसंचालन विद्यार्थीनी प्रतिक्षा गरड व अपेक्षा गरड यांनी केले, कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी अनंत किडिले, विशाल यांनी प्रयत्न केले. यावेळी शालेय व्यवस्थापन समिती अध्यक्ष खंडेराव शिवरे शाळेतील शिक्षक शिवशंकर खेळगे, विलास चव्हाण, शिक्षिका अशुमती व्हट्टे, यांच्यासह शाळेचे विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते.




0 Comments