वायगाव व वाढवणा पाटीवरील अवैध दारु विक्रीला आर्शिवाद कोणाचा ?
मिशन ढाबा मोहिम राबविणार तरी कोण?
सुज्ञ नागरिकांचा सवाल.
मुख्य संपादक द्रोणाचार्य कोळी
9420010756
लातुर : जिल्ह्याच्या विविध भागातील ढाब्यातील अवैध दारु विक्रीला ब्रेक लावण्यासाठी रा.उ.शु.चे अधिक्षक केशव राऊत यांच्या सुचनेवरुन सर्व संबंधितांच्या रडावर ढाबे (लंचहोम) आले असून जिल्ह्यातील कांही लंच होम (ढाबे) यांच्यावर रेड करुन २२ गुन्हे दाखल केले आहेत.तर २९ जणांना अटक केली आहे.परंतू,याच जिल्ह्यात असलेल्या नांदेड-बिदर या राज्य मार्गावरील कांही लंच होम (ढाब्या) मध्ये अवैधरित्या देशी अन् विदेशी दारुची खुलेआम बेभावाने विक्री होताना आणि पहाटे पासून ते राञी उशीरापर्यंत या ठिकाणी मदीरा प्रेमींची गर्दी दिसते.पण संबंधितांना दिसत नसल्याने हा भाग लातुर जिल्ह्यात येत नाही का?तसेच येथील अवैध दारु विक्रेत्यांना आर्शिवाद देतयं तरी कोण? व मिशन ढाबा ही मोहिम राबविणार कोण?कधी? असे या पाटीवरील जनतेतून प्रशासनाला विचारले जात आहेत. तसेच लातुर जिल्हा अवैध धंदे मुक्त करण्याचा विडा उचलणा-या आणि विविध भागातील अवैध धंद्यावर रेड करण्यासाठी त्या त्या ठाण्यातील अधिकारी,कर्मचारी यांना आदेशित करणा-या जिल्हा पोलिस अधिक्षक अमोल तांबे यांच्या धोरणालाच सर्व संबंधितांनी हरताळ फासल्याचे येथे खुलेआम चालणा-या अवैध दारु विक्रीकडे बघून म्हटले जाते आहे.
अधिक्षक रा.उ.शुल्क यांच्या आदेशावरुन परवाच लातुर जिल्ह्यातील कांही ढाब्यावर रा.उ.शु. च्या संबंधितांनी छापे टाकूण ढाब्यात बसून दारु पिणारे व विकणारे,पिऊ देणारे लोकांवर २२ गुन्हे दाखल केले आहेत.यामध्ये २९ जणांना अटक ही करण्यात आले आहे.पण वरील दोन ठिकाणच्या ढाब्याकडे जाणुनबुजून दुर्लक्ष केल्याचे दिसते.म्हणुन येथील त्या ढाब्यात दारु पिणा-यांसाठी स्पेशल सोय करुन दिली जाते.असे मदीराप्रेमीं मध्ये बोलले जाते.ढाब्यात बसून अवैधरित्या दारु पिणे व विक्री करणे हा कायद्याने गुन्हा असलातरी वरील २ ठिकाणचे ढाबेवाले कायदा व संबंधितांना न जुमानता खुलेआम अवैध दारु विकतात.म्हणुन शासन मान्य देशी,विदेशी बार मालक मोठ्या संकटात सापडले आहेत.
कारण,सर्व प्रकारच्या दारुवरील कर वाढविल्याने दुकाणातुन दारु खरेदी करतात.आणि ढाब्यात विकतात.व ढाब्यात येणा-या ग्राहकांची स्पेशल सोय पण करतात.म्हणुन आजकाल हे ढाबे राञंदिवस हाऊस फुल्लं दिसतात.ढाब्यात दारु येथे कुठून त्या किरकोळ विक्रेत्यावर ही कारवाई होणे गरजेचे आहे.कारण,किरकोळ विक्रीचा परवाना असताना अवैध दारु विक्रेत्यांना ठोकमध्ये पेट्यांच्या पेट्या दारु विक्री करता येत नाही.हा शासन नियम,कायदा आहे.म्हणुन अवैध दारु विक्रेत्यांना पेट्यांच्या पेट्या दारु विकणा-या किरकोळ दारु विक्रेत्यावर सर्व प्रथम कडक कारवाई व्हायला पाहिजे.पण अशी कारवाई करायची धमक आजवर ना राज्य उत्पादन शुल्क विभागाने दाखवली.ना पोलिस प्रशासनाने..! यामूळे वरील ठिकाणी अवैध दारु पाण्यापेक्षाही जास्त विकली जाते आहे.
तेंव्हा मिशन ढाबा,ही मोहिम कोण व कधी राबविणार?याकडे सर्वसामान्य जनतेचे लक्ष लागले आहे.कारण,या ठिकाणी हजारोंच्या संख्येत महिला प्रवाशांसह शाळा व काॅलेज मध्ये जाणा-या विद्यार्थीनी एसटी बसची वाट बघत थांबतात.व या महिलांना तळीरामाच्या गोंधळाचा हकनाक ञास सहन करावा लागतो.तेंव्हा याचा बंदोबस्त व्हायला पाहिजे.अशी जनभावना जोर धरू लागली आहे.


0 Comments