सांगवी येथे विज पडून एका महिलेसह चार जनावरे दगावली
मुख्य संपादक द्रोणाचार्य कोळी
9420010756
निलंगा : कोकळगावसह परिसरात शनिवार दि. २० सप्टेंबर रोजी सायंकाळी पाच वाजण्याच्या सुमारास वीजेच्या कडकडाटासह मोठा पाऊस बरसला. या झालेल्या पावसात निलंगा तालुक्यातील मौजे सांगवी येथे काही अंतरावर दोन ठिकाणी वीज पडली. यात घरामागे बांधलेली जनावरे घरात आणण्यासाठी गेलेल्या अनिता मारुती राठोडे वय ४० या महिलेसह चार जनावरांचा जागीचा मृत्यू झाला.
यामध्ये सांगवी पूर्व येथील घराच्या पाठीमागे असलेली म्हैस पावसामुळे घरात आणण्यासाठी अनिता मारुती राठोडे वय ४० वर्षे ही महिला व सोबतची म्हैस व त्यांचा पाळीव कुत्रा ही दगावला.तर याच शिवारात तेरणा नदीच्या बाजूला असलेल्या महादेव भानुदास सरतापे या शेतक-यांची बैलजोडी वीज पडून दगावली आहे. परिसरात सततच्या पावसामुळे काढणीला आलेल्या पिकांचेही मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे. यामुळे सरकारने तात्काळ मदत करावे अशी मागणी नागरकांमधून करण्यात येत आहे.



0 Comments