Advertisement

ग्रामीण भागात जन्माष्टमी उत्साहात साजरी

 ग्रामीण भागात जन्माष्टमी उत्साहात साजरी 




मुख्य संपादक द्रोणाचार्य कोळी 

9822041174



लातूर : लातूर जिल्ह्यातील अनेक गावांमध्ये कृष्णाच्या  जन्मसोहळ्यानिमित्त विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले होते.

अनेक ठिकाणी दहीहंडीचे आयोजन करण्यात आले होते. गोविंदा पथकांनी  दहीहंडी फोडून जल्लोष केला.तर 

मंदिरांमध्ये भजन, कीर्तन, पाळणे आदी कार्यक्रम झाले. 

लहान मुलांनी कृष्णाच्या बाललीलांचे सादरीकरण केले. अनेक भाविकांनी उपवास केले आणि

मंदिरांना आकर्षक सजावट करण्यात आली होती. 

उपवासाचे पदार्थ आणि कृष्णाला नैवेद्य दाखवण्यात आले तर 

जिल्ह्यातील अनेक गावांमध्ये पारंपरिक पद्धतीने भगवान श्रीकृष्णाचे महिलांनी पाळणे गावून जन्माष्टमी साजरी केली. एकंदरीत 

कृष्णाच्या भक्तांनी भक्तिभावाने हा उत्सव साजरा केला.



Post a Comment

0 Comments