Advertisement

कोकळगाव येथील जिल्हा परिषद शाळेत भारताचा स्वातंत्र्य दिन उत्साहात साजरा

 कोकळगाव येथील जिल्हा परिषद शाळेत भारताचा स्वातंत्र्य दिन उत्साहात साजरा 




मुख्य संपादक द्रोणाचार्य कोळी 

9822041174


निलंगा : निलंगा तालुक्यातील कोकळगाव पूर्व व कोकळगाव पश्चिम येथील दोन्ही जिल्हा परिषद शाळेत  भारतीय स्वातंत्र्याचा 79 वा वर्धापन दिन सोहळा मोठ्या उत्साहात आनंदात साजरा करण्यात आला.

 स्वातंत्र्याच्या उत्साहाने व देशभक्तीच्या चैतन्याने ध्वज स्तंभाचे पूजन व ध्वजारोहण कार्यक्रम शाळेतील भारतमाता बनलेल्या विद्यार्थिनीच्या  हस्ते पार पाडण्यात आले.

कार्यक्रमाच्या अध्यक्ष स्थानी माजी सैनिक राम किल्लारे तर प्रमुख पाहुणे शाळा व्यवस्थापन समितीचे अध्यक्ष, धनराज लामतुरे, दत्तात्रय बनसोडे, वसंत मंजुळे, जनक बनसोडे,इत्यादी मान्यवर व्यासपीठावर उपस्थित होते.

 कार्यक्रम प्रसंगी विद्यार्थ्यांनी स्वातंत्र्य दिनानिमित्त भाषणे केली.

मुख्याध्यापिका आरती कोल्हे  यांनी 1947 स्वातंत्र्या बाबतीत ब्रिटिश राजवटी बाबतीत, व क्रांतिवीरांची गाथा विध्यार्थ्यांना व गावकरी बांधवाना मंचावर व्यक्त करून त्याची जाणीव करून दिले.

कार्यक्रमाच्या संचालन संदीप तिप्पणबोने यांनी केले.सरते शेवटी कार्यक्रमाचे समारोप प्रसाद वाटप करून व वंदे मातरम या गीताने करण्यात आले.



Post a Comment

0 Comments