नांदुरा खुर्द येथील बौद्ध स्मशानभूमीचा प्रश्न तात्काळ मार्गी लावा
बबलू गवळे
मुख्य संपादक द्रोणाचार्य कोळी
9822041174
अहमदपूर:- लातूर जिल्ह्यातील अहमदपूर तालुक्यातील नांदुरा खुर्द येथील मुलभूत विकास कामाची भीम आर्मीच्या वतीने अनेकदा समशानभुमी सह मूलभूत विकास कामाची मागणी करून ही आद्यप कामे करण्यात आली नाहीत. यापूर्वी तीन वेळेस निवेदने सुद्धा देण्यात आलेले होते. त्याचप्रमाणे ५ मे२०२५ व ६ मे२०२५ असे दोन दिवस धरणे आंदोलनही करण्यात आले होते. तरीही नांदुरा खुर्द गावातील कसलेही मुलभूत विकास कामे करण्यात आलेली नाहीत. यावेळी सुद्धा निवेदन देऊन सुद्धा दखल घेतली नाही तर दि. १४ ऑगस्ट २०२५ या दिवशी निदर्शने करण्यात येतील व दि. १५ ऑगास्ट २०२५ रोजी बौद्ध स्मशानभूमीची व नांदुरा खुर्द या गावातील नागरिकांच्या हक्क अधिकारांची अंत्ययात्रा व अंत्यविधी आपल्या कार्यालयासमोर काढण्यात येईल असा इशारा भीम आर्मी चे जिल्हा कार्याध्यक्ष बबलू गवळे यांनी तहसीलदार यांना दिलेल्या निवेदनातून दिलेला आहे. प्रशासनाने अशा गोष्टी गांभीर्याने नोंद घ्यावी असे ही निवेदनात म्हंटले आहे.
यावेळी निवेदनावर भीम आर्मीचे जिल्हा कार्याध्यक्ष बबलू गवळे अहमदपूर तालुका अध्यक्ष अफसर शेख तसेच
सामाजिक कार्यकर्ते रोहन कांबळे सामाजिक कार्यकर्ते केशव कांबळे, राजपाल गवळे, सुनील गवळे,आदी कार्यकर्ते यांची उपस्थिती होती.


0 Comments