हाळी-हंडरगुळी परिसरात वादळी वा-यासह पडलेल्या पावसामुळे ऊस पिकांचे फड झाले जमीनदोस्त
मुख्य संपादक द्रोणाचार्य कोळी
9822041174
हंडरगुळी : दि.१५ ते १६ च्या मध्यराञी वादळी वारे तसेच ढगांचा गडगडाटात हाळी परिसरात पडलेल्या मुसळधार पावसाने ऊसाचे प्रामुख्याने शेतकरी बांधवांचे मोठे नुकसान झाले आहे.
या परिसरात शेकडो एक उभा ऊस जमीन दोस्त झाल्याचे बघून सामान्य जनतेसह ऊस उत्पादक शेतक-यांचे डोळे पाणावल्याचे दिसते.म्हणुन या नुकसानीचा पंचनामा करुन भरपाई देणे गरजेचे आहे.
दि.१५ व १६ च्या मध्यराञी जोरदार वा-यासह ढगांचा गडगडाट सुरु झाला.आणि या सोबतच मुसळधार पावसाला सुरुवात झाली.हा पाऊस व वारे इतके जोरदार होते की अनेक घरांच्या खिडक्या आपोआप उघडून आत मध्ये पाणी शिरले.सुदैवाने यात जिवितहानी झाली नसलीतरीही या शिवारातील अनेक शेतक-यांनी मोठ्या कष्ठाने काळ्या उन्हाळ्यामध्ये लावुन वाढवलेल्या ऊसाचे फडच्या फड जमीनदोस्त झाल्याने अगोदरच आर्थिक संकटात असलेला शेतकरी यामुळे आणखीन मोठ्या मानसिक व आर्थिक संकटात सापडला असून या सर्व संकटातून बाहेर काढायला प्रशासन व लोकप्रतिनिधी मदतीचा हात देतील का?याकडे लक्ष लागलेय
वादळी वारे व पावसामुळे ऊसाचे नुकसान झाल्याची दि.१६ रोजी ३ वा.पर्यंत एकही तक्रार आली नाही.
विनोद धुळे,वाढवणा मंडळ सहायक शेतकी अधिकारी


0 Comments