Advertisement

कासार शिरसीत विद्यार्थ्यांची सुरक्षा रामभरोशे इयत्ता नववी वर्गातील मुलाचे अपहरण प्रशालेत सीसीटीव्ही बसवण्याची पालकांची मागणी

 कासार शिरसीत विद्यार्थ्यांची सुरक्षा रामभरोशे इयत्ता नववी वर्गातील मुलाचे अपहरण प्रशालेत सीसीटीव्ही बसवण्याची पालकांची मागणी



मुख्य संपादक द्रोणाचार्य कोळी 

9822041174



कासार शिरसी : कासार शिरसी येथील श्री करी बसवेश्वर विद्यालयात इयत्ता नववीच्या वर्गात शिकणारा विद्यार्थी कृष्णा हनुमंत सूर्यवंशी वय 14 वर्ष याचे गुरुवार दिनांक 14 ऑगस्ट रोजी सकाळी दहाच्या सुमारास शाळेच्या आवारातून त्याच्या कौटुंबिक वादातून अपहरण करण्यात आले होते. या घटनेची कासार शिरसी पोलीस ठाण्यात नोंद करण्यात आली आहे. सदर घटनेमुळे शहरात चिंतेचे वातावरण निर्माण झाले असून प्रशालेत सर्वत्र त्वरित सीसीटीव्ही कॅमेरे बसवण्याची मागणी करण्यात येत आहे. 

लातूर जिल्ह्यातील नोंदणीकृत काही शाळांकडून सीसीटीव्ही बसवण्याबाबत चाल दखल  केली जात असल्याचे समोर आले आहे. ही डोळे झाक कशासाठी असा संतप्त सवाल पालकातून व्यक्त करण्यात येत आहे 

महिला अत्याचाराच्या घटनांच्या पार्श्वभूमीवर लातूर जिल्ह्यातील शाळांनी मुलींच्या सुरक्षेसाठी अधिक जबाबदारी घेतली आहे. एकूण 266 शाळा असून बहुतांश शाळांमध्ये सीसीटीव्ही यंत्रणा कार्यान्वित करण्यात आली आहे ज्या शाळेमध्ये सीसीटीव्ही कॅमेरे नाहीत अशा शाळांनी तात्काळ पूर्तता करावी अशा सूचना शिक्षण विभागाने दिल्या आहेत .

शाळकरी मुला मुलींच्या सुरक्षेसाठी शाळांमध्ये सीसीटीव्ही व अन्य सुरक्षात्मक उपाययोजना करण्याचे निर्देश शासन स्तरावरून देण्यात आले आहे असे असताना काही शाळांनी अद्याप सीसीटीव्ही सह इतर उपाययोजना केल्या नसल्याचे समोर आले आहे. या शासन निर्देशाकडे अशा शाळांकडून डोळे झाकपणा होत असल्याचे दिसून येत आहे. लातूर जिल्ह्यात नोंदणीकृत खाजगी सरकारी शाळा 266 आहेत बहुतांश शाळांनी सीसीटीव्ही कॅमेरे बसवले तर उर्वरित शाळांनी अद्यापही सीसीटीव्हीची यंत्रणा कार्यान्वित केली नाही. त्यांच्यावर कारवाई करण्याची गरज आहे याबाबत पालकांनी पाठपुरावा करावा असे आवाहन करण्यात येत आहे.

कासार शिरसी नुकत्याच घडलेल्या या प्रकरणी येथील पोलिसांनी अत्यंत तत्परतेने तपास केला असून, या मुलासह अपहरण करता आरोपी सुरेश बंडगर वय 50 वर्ष राहणार कासार शिरसी यास पुणे येथून अटक केली असून सध्या अपहरण करता सूर्यवंशी हा पोलिसांच्या ताब्यात असून अधिक  तपास प्रवीण राठोड यांचे सह बळीराम मस्के सलीम शेख हरी डावरगावे नागमोडे व गायकवाड हे करत आहेत.

Post a Comment

0 Comments