Advertisement

निलंगा येथील सम्राटनगरात वर्षावास प्रवचन मालिका संपन्न

 निलंगा येथील सम्राटनगरात वर्षावास प्रवचन मालिका संपन्न



मुख्य संपादक द्रोणाचार्य कोळी 

9822041174


निलंगा : भारतीय बौद्ध महासभा, तालुका शाखेच्या वतीने संस्कार उपाध्यक्ष इंद्रजीत कांबळे यांच्या निवासस्थानी वर्षावास धम्म प्रवचन मालिकेचे आयोजन करण्यात आले होते.

कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी तालुकाध्यक्ष प्रा. डॉ. बी. आर. गायकवाड होते. तर प्रमुख प्रवचनकार प्रा. रोहित बनसोडे यांनी "महामंगलसूत्त- मानवाचे मंगल कशात आहे?" या विषयावर सखोल अभ्यासपूर्ण मार्गदर्शन केले. तथागत सम्यक सम्बुद्धाने सांगितलेल्या 38 मंगल सुत्ताचे सविस्तर विवेचन करून उपस्थित धम्म बांधवांना आपल्या प्रवचनातून बौद्धांचे कल्याण महामंगल सुत्ताच्या माध्यमातून साधता येते, असे विचार प्रा. बनसोडे यांनी मांडले.

यावेळी जिल्हा शाखेचे कायदेविषयक सल्लागार ॲड. आर. वाय. कांबळे, बौद्धाचार्य दत्ता सोनकांबळे, शहराध्यक्ष डी. एन. सूर्यवंशी, समता सैनिक दल प्रमुख तथा संरक्षण उपाध्यक्ष ॲड. विशाल गायकवाड, रजनीकांत कांबळे, व्यावसायिक बलवान सूर्यवंशी , निळकंठ सातपुते, शेषेराव कांबळे, राष्ट्रवादी काँग्रेसचे शहराध्यक्ष धम्मानंद काळे, पत्रकार मिलिंद कांबळे, प्रकाश गायकवाड, व्यंकट कांबळे, माजी नगरसेवक विजयकुमार सूर्यवंशी, तानाजी गायकवाड, विष्णू कांबळे, गिरीश पात्रे, राजकुमार धैर्य, एस. के. चेले,  व पदाधिकारी आदींसह सम्राट नगर, अशोक नगर येथील बौद्ध उपासक उपासिका, इंद्रजीत कांबळे यांचे सर्व कुटुंबीय उपस्थित होते. कार्यक्रमाचे संचलन व प्रास्ताविक जिल्हा संघटक संतोष कांबळे केळगावकर यांनी केले. अध्यक्षीय समारोपात डॉ. बी. आर. गायकवाड यांनी श्रावण पौर्णिमेचे महत्त्व सांगितले. कार्यक्रमाच्या सुरुवातीला महापुरुषांच्या प्रतिमेचे पूजन करून त्रिसरण पंचशील ग्रहण  करण्यात आले. इंद्रजीत कांबळे यांचे वडील कालकथित लिंबाजी कांबळे यांच्या पुण्यस्मरणानिमित्त त्यांनाही अभिवादन करण्यात आले. कांबळे कुटुंबीयांच्या वतीने उपस्थित सर्व उपासकांना फलाहार व खीर दान करण्यात आले. शेवटी सरणंतय गाथा घेऊन प्रवचनाची सांगता झाली.

Post a Comment

0 Comments