लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांची जयंती उत्साहात साजरी
मुख्य संपादक द्रोणाचार्य कोळी
9822041174
निलंगा : शुक्रवार दिनांक 1ऑगस्ट रोजी निलंगा तालुक्यातील कोकळगाव येथे लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांची जयंती उत्साहात साजरी करण्यात आली.जयंतीचा मुख्य सोहळा बसस्थानकाजवळील अण्णा भाऊ साठे यांच्या समाज मंदिरा समोर व ग्रामपंचायत कार्यालय येथे संपन्न झाला.यावेळी निलंगा पंचायत समितीचे माजी उपसभापती ज्ञानेश्वर वाकडे व सरपंच गुरलिंग वाकडे यांच्या हस्ते प्रतीमेस पुष्पहार अर्पण करून,करण्यात आले.उपस्थित मान्यवरांनी अण्णा भाऊ साठे यांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण करून अभिवादन केले.
यानिमित्ताने झालेल्या प्रबोधन सभेच्या अध्यक्षस्थानी सरपंच गुरलिंग वाकडे हे होते. यावेळी मा. ज्ञानेश्वर वाकडे यांनी उपस्थितांना समयोचित मार्गदर्शन करताना म्हणाले प्रत्येक महापुरुषांचे राष्ट्रासाठी व समाजासाठी फार मोठे योगदान आहे.त्यामुळे समाजातील प्रत्येक घटकातील नागरिकांनी महापुरुषांच्या जयंतीला उत्साह दर्शवून,महापुरुषांच्या विचारांचे तरंग अंगी बाळगणे आवश्यक असल्याचे मत व्यक्त केले.प्रमुख पाहुणे म्हणून ग्रामपंचायत सदस्य माधवराव पाटील, शंभुलिंग स्वामी,अजित पाटील,उपसरपंच सतीश माने, बालाजी वाघांना,विरभद्र वाकडे कमलाकर सूर्यवंशी, केरबा शिंदे,बालाजी कामले, गोविंद लामतुरे, राजेंद्र शिंदे, जगदीश सूर्यवंशी, अमोल शिंदे, बालाजी सूर्यवंशी यांची उपस्थिती होती.कार्यक्रमाचे सूत्रसंचालन जगदीश सूर्यवंशी यांनी केले .



0 Comments