छावा संघटनेचे प्रदेशाध्यक्ष विजय घाडगे पाटील यांच्यावर प्राणघातक हल्ला करणाऱ्यावर कायदेशीर कार्यवाही करावी अन्यथा तीव्र आंदोलन केले जाईल
किशोर जाधव
मुख्य संपादक द्रोणाचार्य कोळी
9822041174
लातूर : छावा संघटनेचे प्रदेशाध्यक्ष विजय घाडगे पाटील यांच्यावर प्राणघातक हल्ला करणाऱ्या गुंड प्रवृत्तीच्या लोकांवर कायदेशीर कार्यवाही करावी अन्यथा तीव्र आंदोलन केले जाईल असा इशारा शिवसेना सहकार सेनेचे जिल्हा प्रमुख किशोर जाधव यांनी इशारा दिला आहे.
महाराष्ट्र राज्याचे कृषिमंत्री विधान भवनात ऑनलाइन रमी गेम खेळत आहेत. त्यांना शेतकऱ्याचे काहीही देणे घेणे लागत नाही. सामान्य जनतेने आपणास शेतकऱ्याचे प्रश्न सोडवण्यासाठी विधी मंडळात पाठवले असून कृषी मंत्री पद म्हणजे ओसाड गावची पाटील की आपण म्हणतात. ओसाड गावचे पाटील साहेब ओसाड गावातून कृषीमंत्र्यास काही मिळत नाही म्हणून पत्ते खेळून आपलं घर चालवताय काय? विधिमंडळात जंगली रमी खेळणारे महाराज शेतकऱ्याच्या शेती मालाला हमीभाव नाही. खते आणि बी बियाणांचा काळाबाजार चालू आहे. आपण रमीं खेळण्यात मग्न व कृषी विभागाचे भरारी पथके काय हवेत भरारी घेत आहेत का? कृषी खात्याकडून कोणत्याही बोगस खत व बियाणे विक्रेत्यावर कारवाई झाली का? हे सर्व पाहून लातूर जिल्ह्यातील अशाप्रकारे प्रशासन काम करत असताना त्याचा निषेध करण्यासाठी कृषिमंत्र्यावर कार्यवाही करा असे निवेदन राष्ट्रवादीच्या नेत्यांना दिले तर राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्यांना राग येतो आणि हाणामारी करतात. कायदा व सुव्यवस्था कुठे गेली? कायद्याचा व प्रशासनाच्या बळावर सामान्य शेतकऱ्यांचा आवाज कोणीही दाबू शकत नाही. शेतकरी असे कृत्य करणाऱ्यास धडा शिकवल्याशिवाय राहणार नाहीत. सामान्य शेतकऱ्याच्या पुत्राला हाणामारी करता मग कृषीमंत्री विधिमंडळात पत्ते खेळतात त्यांच्यावर कार्यवाही काय करणार? शेतकऱ्याला गेली चार वर्षापासून ठिबक सिंचन, स्प्रिंकलर, विहीर, गोठा या अशा अनेक योजनांचे पैसे अद्याप पर्यंत शेतकऱ्यांना मिळाले नाहीत. शासनास योजनेचे पैसे देता येत नाही तर योजना चालूच करता कशाला? हे शासन शेतकऱ्याची फसवणूक करत आहे. काल झालेल्या हाणामारीच्या घटनेचा तीव्र निषेध व्यक्त करत आहोत. प्राणघातक हल्ला करणाऱ्या गुंड प्रवृत्तीच्या लोकांवर योग्य ती कायदेशीर कार्यवाही करावी अन्यथा शिवसेना सहकार सेना रस्त्यावर उतरल्याशिवाय राहणार नाही याची नोंद घ्यावी. असा इशारा शिवसेना सहकार सेनेचे जिल्हा प्रमुख किशोर जाधव यांनी सरकार ला निवेदनाद्वारे इशारा दिला आहे.



0 Comments