Advertisement

जातीचं प्रमाणपत्र द्या; अन्यथा कर्नाटक राज्यात वास्तव्यास परवानगी द्या आदिवासी कोळी महादेव समाजाच्या विद्यार्थ्यांनी दिले निवेदन

  जातीचं प्रमाणपत्र द्या; अन्यथा कर्नाटक राज्यात वास्तव्यास परवानगी द्या

आदिवासी कोळी महादेव समाजाच्या विद्यार्थ्यांनी दिले निवेदन



मुख्य संपादक द्रोणाचार्य कोळी 

9822041174




निलंगा : मुख्यमंत्री देवेंद्र फडणविस याना निलंगा मतदार संघातील महादेव कोळी समाजाच्या विद्यार्थ्यांनी महाराष्ट्रात महादेव कोळी जातीचे प्रमाणपत्र मिळत नसल्यामुळे कर्नाटक राज्यात रहिवास करण्यासाठी परवानगी मागीतली आहे. अशा मागणीचे निवेदन उपजिल्हाअधिकारी निलंगा यांच्या मार्फत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना दिले आहेत.

सकल आदिवासी कोळी, महादेव मल्हार कोळी समाज संघटनेच्या वतीने सुलभतेने जातीचे प्रमाणपत्र देण्यात यावे, रक्त नात्यातील व्यक्तीला वैधता प्रमाणपत्र देण्याबाबत परिपत्रक काढावे, 1950 पूर्वी कोळी नोंदी असलेल्या व्यक्तींना त्या आधारावर जात प्रमाणपत्र निर्गमित करावे यासह निर्गमउतारा, टीसी, वडिलांचे जात प्रमाणपत्र, 36 अ च्या नोंदी नुसार जात प्रमाणपत्र निर्गमित करावे यासह विविध मागणीसाठी दि. 21 जुलै रोजी पासून म्हणजेच गेल्या चार दिवसापासून उपविभागीय अधिकारी निलंगा येथे अन्नत्याग उपोषण सुरु केले असून या उपोषणाचा आजचा चौथा दिवस आहे. या उपोषणाला विविध सामाजिक संघटना व पक्षाच्या वतीने जाहीर पाठिंबा दिला आहे.

देशाला स्वातंत्र्य मिळून ७५ वर्षे झाले आहेत.परंतु आम्हाला जात प्रमाणपञासाठी अजूनही झगडाव लागतय आमचे शैक्षणिक नुकसान होत आहे. आमचे पूर्वज कोळी महादेव असून आमच्या पूर्वजांच्या कागदपञावर अज्ञानपणामुळे कोळी  असल्याच्या नोंदि आहेत जर काही लोकांच्या जुन्या नोंदी कोळी महादेव आहेत अनेकांच्या घरांमध्ये वैधता असतानाही हे प्रशासनामध्ये बसलेले अधिकारी आम्हाला जाणीवपूर्वक ञास देत असून आमचे शैक्षणिक नुकसान करत आहेत. असा आरोप करत राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस याना निवेदन दिले आहे. या निवेदनावर निलंगा मतदार संघातील निलंगा देवणी निलंगा येथील शालेय विद्यार्थ्यांच्या स्वक्षऱ्या आहेत. यावेळी आमदार संभाजीराव पाटील निलंगेकर यांचे विश्वासू चेअरमन दगडू सोळुंके, संगायोचे अध्यक्ष मनोज पाटील, काँग्रेस प्रदेश सचिव अभय साळुंके, पंचायत समितीचे माजी सभापती अजितराव माने, अंबादास जाधव, काँग्रेस शहराध्यक्ष अजित नाईकवाडे, संभाजी सेनेचे प्रदेश प्रवक्ते राजकुमार साळुंके, भाजपा महामंत्री महामंत्री अविनाश कोळी, शिवसेनेचे नगरसेवक उमरगा नगरपालिकेचे नगरसेवक पंढरीनाथ कोणे, लातूरचे माजी पंचायत समिती सदस्य राम चामे, पाठिंबा दिला असून याठिकाणी तालुक्यातील आदिवासी कोळी मल्हार कोळी समाजाचे महिला लहान विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते.

Post a Comment

0 Comments