अखेर पानचिंचोली येथील वैद्यकीय अधिकारी याची उचल बांगडी
मुख्य संपादक द्रोणाचार्य कोळी
9420010756
निलंगा : निलंगा तालुक्यातील पानचिंचोली येथील वैद्यकीय अधिकारी डॉक्टर सुनील पोद्दार हे वेळेवर उपस्थित न राहणे रुग्णांशी वाद घालणे, रूग्नासोबत अरे तुरे शी वाद विवाद करणे या प्रकारच्या विविध तक्रारी असल्याने,नागरिकांमधून असंतोष व्यक्त केले जात होते,
यामुळे करण गायकवाड प्रशासनाला निवेदन देऊन संबंधित अधिकाऱ्यावर कार्यवाही करून कार्य कुशल कर्तव्यदक्ष अधिकाऱ्याची नेमणूक करण्याची मागणी केली होती. तसेच संबधित डॉक्टरवर कार्यवाही नाही झाल्यास लोकशाही पद्धतीने आंदोलन करण्याचा इशाराही दिला होता. प्रशासनाने लागलीच या गोष्टीची दखल घेत वैद्यकीय अधिकारी डॉक्टर सुनील पोतदार यांची उचल बांगडी करण्यात आली, पान चिंचोली येथील प्राथमिक आरोग्य केंद्रामध्ये नवीन कर्तव्यदक्ष महिला अधिकाऱ्याची नेमणूक करण्यात आली असून त्यामुळे गावात आनंदाचे वातावरण निर्माण झाले असल्याचे सांगण्यात येते आहे.



0 Comments