Hot Posts

6/recent/ticker-posts

आदिवासी समाजातील अल्पवयीन मुलीला फुस लावणारा संशयित आरोपी रमेश पाटील याला तात्काळ अटक करावी! शहर अध्यक्ष अरविंद नाईकवाडी

 आदिवासी समाजातील  अल्पवयीन मुलीला फुस लावणारा संशयित आरोपी रमेश  पाटील याला तात्काळ अटक करावी! 


शहर अध्यक्ष अरविंद नाईकवाडी 



मंगळवेढा : रामन्ना कोळी  रा सिद्धापूर ता मंगळवेढा जि सोलापूर यांची मुलगी दिनांक १६ एप्रिल २०२५ रोजी मध्यरात्रीपासून घरातून गायब झाले होती तीला दि 23 एप्रिल 2025 रोजी पोलीस प्रशासन ने तिला शोधले आहे यातील संशयित काही आरोपींना अटक केली आहे यातील आणखी एक संशयित आरोपी  रमेश नागनाथ पाटील व त्याचे सर्व सहकारी यांना तात्काळ अटक करून पोस्को अंतर्गत व ॲट्रॉसिटी अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात यावा संशयित आरोपी रमेश नवनाथ पाटील याचे सी डी आर मध्ये पोलीस प्रशासनाला पुरावे मिळाले आहेत तरीही जाणून-बुजून दुर्लक्ष करत आहेत मंगळवेढा पोलीस स्टेशनचे पीआय  यांच्यावर राजकीय नेते लोकप्रतिनिधी व आमदार दबाव टाकत आहेत पोलीस प्रशासनाने कोणाच्याही दबावाला बळी न पडता रमेश नागनाथ पाटील याला लवकरात लवकर अटक करावी असे पत्र मुख्यमंत्री साहेब महाराष्ट्र राज्य मुंबई मा पालकमंत्री साहेब सोलापूर मा जिल्हाधिकारी साहेब सोलापूर मा पोलीस महासंचालक कोल्हापूर मा पोलीस ग्रामीण अधीक्षक सोलापूर मा उपविभागीय दंडाधिकारी  मंगळवेढा मा तहसीलदार  मंगळवेढा त्यांना सर्वांना ई-मेल पाठवले आहे मंगळवेढा पोलीस स्टेशनचे पी आय भेटून निवेदन देण्यात आले आहे पी आय साहेब यांनी  तात्काळ रमेश नवनाथ पाटील याला अटक करावी अन्यथा महर्षी वाल्मिकी संघाच्या वतीने व सकल आदिवासी महादेव कोळी जमातीच्या वतीने दि 28 एप्रिल 2025 रोजी पासून मंगळवेढा पोलीस स्टेशन कार्यालय बाहेर लोकशाही मार्गाने बेमुदत धरणे आंदोलन करण्यात येईल याची नोंद घ्यावी आंदोलन तीव्र झाल्यास त्याला मंगळवेढा पोलीस स्टेशन जबाबदार राहील याची नोंद घ्यावी असे आव्हान महर्षी वाल्मिकी संघाचे शहराध्यक्ष अरविंद नाईकवाडी यांनी केले आहे.



 

Post a Comment

0 Comments