ब्युटी पार्लरचे प्रशिक्षण पूर्ण केलेल्या विद्यार्थिनींना प्रमाणपत्राचे वाटप
मुख्य संपादक प्रा. द्रोणाचार्य कोळी
9822041174
लातूर : ग्लॅमर मेकअप स्टुडिओ यांच्या संयुक्त विद्यमाने; लातूर येथे चालू असलेल्या स्किल टू सक्सेस ग्लॅमर मेकअप स्टुडिओ येथे कौशल्य प्रशिक्षण घेतलेल्या महिलांना व मुलींना मान्यवरांच्या हस्ते प्रमाणपतत्राचे वाटप करण्यात आले.
यावेळी अध्यक्षस्थानी ग्लॅमर मेकअप स्टुडिओच्या डायरेक्टर रुपाली सोलंकर होत्या तर प्रमुख उपस्थिती म्हणून
स्थानिक महिलां आदींची उपस्थिती होती. यावेळी श्रुतिका अंबुरे, अश्विनी अंबुरे, स्नेहलता कोळी, विद्या ठवरे, वैष्णवी ठवरे, निकिता कांबळे आदीं प्रशिक्षणार्थींना प्रमाणपत्राचे वाटप करण्यात आले.
यावेळी मनोगत व्यक्त करताना ग्लॅमर मेकअप स्टुडिओ लातूर च्या डायरेक्टर रुपाली सोलंकर यांनी, सर्व क्षेत्रात महिला मुली पुढे आल्या आहेत तुम्ही पण शिक्षण घेऊन संधीचे सोने करावे, असे आवाहन केले व मुलींनी कौशल्यानुसार प्रशिक्षण घेण्याचा मार्ग स्वीकारून ग्लॅमर मेकअप स्टुडिओ लातूर येथील प्रशिक्षण पुर्ण केलेल्या विद्यार्थिनींचे सन्मानपत्र व पुष्पगुच्छ देऊन सत्कार केले व त्यांचे अभिनंदन केले.
डायरेक्टर रुपाली सोलंकर यांनी सांगितले की ग्रामीण भागातील व शहरी भागातील मुलींना व महिलांना कौशल्य प्रशिक्षण घेता यावे याकरिता विविध प्रकारचे कोर्सेस उपलब्ध केले आहेत यात महिला व मुलींसाठी बेसिक ब्युटी पार्लर आदी कौशल्य प्रशिक्षण दिले जात असून महिलाही प्रशिक्षण घेण्यासाठी पुढे येत आहेत असे सांगितले यावेळी प्रशिक्षण पूर्ण केलेल्या महिलांना प्रमाणपत्राचे वाटप करण्यात आले. यामुळे प्रशिक्षण पुर्ण केलेल्या विद्यार्थिनींचे सर्वत्र अभिनंदन करण्यात येत आहे.
0 Comments