पांडुरंग लक्ष्मीकांत बळवंत यांची वैज्ञानिक म्हणून निवड
मुख्य संपादक द्रोणाचार्य कोळी
9822041174
लातूर : लातूरच्या पांडुरंग लक्ष्मीकांत बळवंत यांची केंद्रीय लोकसेवा आयोगाकडून शास्त्रज्ञ पदासाठी निवड
करण्यात आली आहे . या
पदासाठी यूपीएससी कडून
मुलाखती घेण्यात आल्या
TIONCLOSERVICE होत्या , त्यात त्यांना सर्वात जास्त गुण मिळाले असून. त्यांचे वडील जिल्हा परिषदेत लिपिक म्हणून कार्यरत होते , तर आई शिक्षिका आहेत . त्यांचे प्राथमिक शिक्षण केशवराज विद्यालय , लातूर येथे झाले . त्यांनी राजर्षी शाह महाविद्यालयातून बीएससी
आणि स्वामी रामानंद तीर्थ मराठवाडा विद्यापीठ , नांदेड मधून एमएससीची पदवी प्राप्त केली . त्यानंतर CSIR NEERI मधून पीएचडी पूर्ण केली . पांडुरंग लक्ष्मीकांत बळवंत यांच्या यशामुळे लातूरमधील शिक्षण क्षेत्रात आनंदाचे वातावरण आहे . त्यांच्या सर्व शिक्षकांनी आणि मित्रांनी त्यांचे अभिनंदन केले आहे . तसेच पो.किशोर तपसे यांनीही त्यांच्यावर कौतुकाचा वर्षाव केला आहे.
0 Comments