उद्यापासून दहावीच्या परीक्षेला सुरुवात
मुख्य संपादक द्रोणाचार्य कोळी
9420010756
लातूर : लातूर जिल्ह्यातील 152 परीक्षा केंद्रांवर उद्यापासून दहावीच्या परीक्षेला सुरुवात झाली असून बारावीच्या परीक्षे प्रमाणेच सदरचीही परीक्षा कॉपीमुक्त,भयमुक्त व निकोप वातावरणामध्ये सुरळीतपणे पार पाडावी यासाठी महाराष्ट्र शासन व महाराष्ट्र राज्य शिक्षण मंडळ तसेच लातूर जिल्हा पोलीस दल प्रयत्नशील असून पोलीस अधीक्षकांनी स्वतः केंद्रावरील पोलीस बंदोबस्त व शिक्षण मंडळ कडून करण्यात आलेल्या नियोजनाचा आढावा घेऊन सूचना दिल्या.
सदर परीक्षा बंदोबस्त करिता 110 पोलीस अधिकारी, 250 पोलीस अंमलदार, तर 900 पुरुष होमगार्ड व 100 महिला होमगार्ड तसेच ड्रोन ची तैनाती करण्यात आलेली आहे.
0 Comments