निलंगेकर कुटुंबाचे भाजपाचे ज्येष्ठ नेते. माजी मंत्री मा. बस्वराज पाटील मुरुमकर यांच्याकडून सांत्वन
मुख्य संपादक द्रोणाचार्य कोळी
9420010756
निलंगा : काँंग्रेस पक्षाचे निष्ठावंत आदर्श नेते. राज्याचे माजी मुख्यमंत्री. कर्मयोगी. स्व. डॉं. शिवाजीराव पाटील निलंगेकर यांच्या सुविद्य पत्नी. स्व. सुशीलाबाई पाटील निलंगेकर यांचे वृद्धापकाळाने रविवारी रात्री दुःखद निधन झाले त्याबद्दल भाजपाचे ज्येष्ठ नेते. राज्याचे माजी मंत्री. आदरणीय. बस्वराज पाटील मुरुमकर यांनी निलंगा येथील" अशोका " निवासस्थानी निलंगेकर कुटुंबाची भेट घेवून सांत्वन केले तत्पूर्वी दिवंगत स्व. सुशीलाबाई पाटील निलंगेकर यांच्या प्रतिमेला पुष्पहार घालून अभिवादन केले...
यावेळी महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीचे सरचिटणीस. अशोकराव पाटील निलंगेकर, डॉं. शरद पाटील निलंगेकर, विजय पाटील निलंगेकर, माजी मंत्री तथा निलंगा विधानसभा आमदार. संभाजी पाटील निलंगेकर, भाजपाचे युवा नेते. अरविंद पाटील निलंगेकर परिवारातील सदस्य उपस्थीत होते.
यावेळी मत्तीसागर पाटील, निलंगा तालुका काँंग्रेस कमिटीचे अध्यक्ष. विजयकुमार पाटील, माजी जि.प. सदस्य.सुरेंद्र धुमाळ, सरपंच. रमेश मोगरगे, नगरसेवक. सुधीर लखनगावे, सतीशआप्पा चिक्राळे, उद्योजक. रवी अग्रवाल, अनिल अग्रवाल यांच्यासह आदी मान्यवर उपस्थित होते.
0 Comments