आमदार अभिमन्यू पवार यांच्याकडून निलंगेकर कुटुंबियांचे सांत्वन...
मुख्य संपादक द्रोणाचार्य कोळी
9420010756
निलंगा : महाराष्ट्राचे माजी मुख्यमंत्री तथा कर्मयोगी दिवंगत नेते डॉ.शिवाजीराव पाटील निलंगेकर यांच्या सुविद्य पत्नी स्व.सुशीलाबाई शिवाजीराव पाटील निलंगेकर यांचे वृद्धापकाळाने निधन झाल्याने औसा मतदारसंघाचे आमदार अभिमन्यू पवार यांनी निलंगा येथील"अशोक बंगला" या निवासस्थानी सांत्वनपर भेट घेत पुष्पहार अर्पण करून अभिवादन केले.
यावेळी महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीचे सरचिटणीस अशोकराव पाटील निलंगेकर,विजय पाटील निलंगेकर,डॉ.शरद पाटील निलंगेकर व इतर कुटुंबीय उपस्थित होते..
तसेच संतोषाप्पा मुक्ता,सदाशिव जोगदंड,राचटे सर,भरत गोरे,लाला पटेल,सुरेंद्र धुमाळ,अमोल सोनकांबळे,किशोर लंगोटे,ऍड.अजित माकने,सोहेल शेख, व इतर कार्यकर्ते उपस्थित होते...
0 Comments