निलंगा व उमरगा बसस्थानकातून कासार सिरसी बस सेवा चालू करा अन्यथा बस बंद आंदोलनाचा सरपंचाचा इशारा
मुख्य संपादक द्रोणाचार्य कोळी
9420010756
निलंगा : निलंगा व उमरगा बस स्थानकातून कासार सिरसीकडे येणाऱ्या प्रवाशांची वाढती गर्दी विचारात घेऊन वरील दोन्हीही आगार प्रमुखांनी आपापल्या बसस्थानकातून कासार सिरसीस स्वतंत्र सेटल बस सेवा उपलब्ध करून द्यावी अन्यथा पूर्व सूचना देऊन कासार सिरसी स्थानकात बस बंद आंदोलन करण्याचा इशारा कासार सिरशीच्या महिला सरपंच सौ. ममता सत्यनारायण डोंबाळे यांनी निलंगा व उमरगा आगार प्रमुखांना दिला असून,देण्यात आलेल्या निवेदनावर सरपंचासह ग्रामविकास अधिकारी सूर्यवंशी यांची स्वाक्षरी आहे.
सुसज्ज असे बांधण्यात आलेले कासार सिरशीच्या बसस्थानकाची 100 लुगडी आणि भागुबाई उघडी अशी अवस्था बनली असून, या स्थानकातून लांब पल्ल्यांच्या गाड्या चालू करण्यात याव्यात अशी मागणी यापूर्वी करण्यात आली होती याची परिवहन महामंडळाने गंभीर दखल घेतल्याचे दिसून येत नाही.याबाबत सर्वत्र संताप व्यक्त करण्यात येत आहे
कासार सिरसी कडे येणाऱ्या प्रवाशांची वाढती गर्दी विद्यार्थी ज्येष्ठ नागरिक आजारी व महिला यांचा विचार करून परिवहन महामंडळाने आपापल्या आगारातून कासार सिरसीसह स्वतंत्र बस सेवा चालू करावी
अशी मागणी करण्यात येत असून या मागणीचे कासार सिरसी शहरातून स्वागत करण्यात येत आहे.
0 Comments