Hot Posts

6/recent/ticker-posts

कोकळगाव पश्चिम येथील जिल्हा परिषद शाळेत क्रांतिज्योती सावित्रीबाई फुले यांची जयंती उत्साहात

कोकळगाव पश्चिम येथील जिल्हा परिषद शाळेत क्रांतिज्योती सावित्रीबाई फुले यांची जयंती उत्साहात 



मुख्य संपादक द्रोणाचार्य कोळी 
9420010756 



निलंगा : निलंगा तालुक्यातील कोकळगाव पश्चिम येथील जिल्हा परिषद प्राथमिक शाळेत शाळेत प्रथम शिक्षिका, क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले यांची जयंती उत्साहाच्या वातावरणात साजरी करण्यात आली.
क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले यांच्या प्रतिमेची पूजन करण्यात आले. याप्रसंगी मुख्याध्यापक आरती कोल्हे यांनी क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले यांच्या जीवन चरित्राचा आढावा घेतला. कार्यक्रमाचे प्रास्ताविक शिक्षक संदीप तिप्पणबोने यांनी केले 
क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले  यांच्या कार्याला अभिवादन करण्यासाठी निबंध स्पर्धा, चित्रकला स्पर्धा, किल्ले बांधणी, विद्यार्थी व महिलांसाठी मार्गदर्शनपर व्याख्याने इत्यादी उपक्रम राबविण्याच्या दृष्टीने नियोजन करण्यात आले आहे.

Post a Comment

0 Comments