जिल्ह्यात २५ जानेवारी रोजी महिला विशेष ग्रामसभेचे आयोजन
मुख्य संपादक द्रोणाचार्य कोळी
9822041174
लातूर : जिल्ह्यातील सर्व ग्रामपंचायतींमध्ये २५ जानेवारी २०२५ रोजी महिला विशेष ग्रामसभांचे आयोजन करण्यात आले आहे. महाराष्ट्र ग्रामपंचायत अधिनियमानुसार २६ जानेवारी रोजी होणाऱ्या ग्रामसभेपूर्वी ही महिला विशेष ग्रामसभा होणार आहे.
महिला विशेष ग्रामसभेमध्ये लक्ष्मी मुक्ती योजनेंतर्गत सातबारावर सहधारक म्हणून महिलेचे नाव लावणे, महिलांसाठी असलेल्या विविध विभागांच्या योजनांची माहिती देणे व अर्ज भरून घेणे, महिला केंद्रित ‘आई’ पर्यटन धोरण राबविणे, ग्रामीण भागातील घरांची नोंदणी पती-पत्नी यांच्या संयुक्त नावे करणे, गावातील विधवा तथा एकल महिलांना शासनाच्या विविध योजनांचा लाभ देणे आदी विषयांवर चर्चा होईल. तसेच मुख्यमंत्री रोजगार निर्मिती कार्यक्रमाबाबत माहिती देण्यात येणार आहे. तसेच बालविवाह रोखण्याबाबत प्रतिज्ञा घेवून विविध उपक्रम राबविण्याचे नियोजन करणे, ग्रामस्तरावर बालसंरक्षण समितीची स्थापना करण्याबाबत या ग्रामसभेत चर्चा केली जाणार आहे, असे जिल्हा परिषदेचे उप मुख्य कार्यकारी अधिकारी बाळासाहेब वाघ यांनी दिली.
0 Comments