एकट्या वाहन चालकास अडवून त्यांच्याकडील मोबाईल व पैसे जबरीने चोरणाऱ्या आरोपीला संभाजीनगर मधून अटक
पोलीस ठाणे एमआयडीसी ची कारवाई
मुख्य संपादक द्रोणाचार्य कोळी
9420010756
लातूर : याबाबत थोडक्यात माहिती अशी की दिनांक 02 जानेवारी रोजी संध्याकाळी सात ते आठ वाजण्याच्या सुमारास विमानतळ परिसरात चार अज्ञात इसमानी रस्त्याने जाणारे येणारे लोकांना अडवून त्यांना धाक दाखवून मोबाईल व रोख रक्कम जबरीने काढून घेतल्याची घटना घडली होती त्यावरून पोलीस ठाणे एमआयडीसी येथे अज्ञात चार आरोपी विरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला होता.
वरिष्ठांचे आदेशान्वये पोलीस ठाणे एमआयडीसी चे पोलीस अधिकारी अमलदारांनी तात्काळ सदर ठिकाणी जाऊन पाहणी केली. पथकाने तक्रारदाराकडे विचारपूस करून त्यांचे वर्णन, चेहरेपट्टीची माहिती करून घेऊन आज्ञत आरोपीचा शोध घेतला असता नमूद घटनेतील एक आरोपी संभाजीनगर जिल्ह्यात असल्याचे माहिती पोलीस पथकाला मिळाली. पोलीस पथकाने 09/01/2025 रोजी संभाजीनगर जिल्ह्यात जाऊन नमूद घटनेतील आरोपी नामे
1) सोनू सिंग दीपक सिंग बोंड वय 28 वर्ष राहणार कांचनवाडी पैठण रोड संभाजीनगर.
यास त्याने व त्याच्या साथीदारांनी मिळून जबरीने चोरलेल्या दोन मोबाईलसह ताब्यात घेतले असून इतर तीन उर्वरित आरोपीच्या शोध कामे पथके रवाना करण्यात आले असून नमूद आरोपीना लवकरच अटक करण्यात येणार आहे.
रस्त्याने जाणाऱ्या वाहन चालकांना अडवून जबरदस्तीने मोबाईल व पैसे काढून घेणाऱ्या आरोपीविरुद्ध पोलीस ठाणे एमआयडीसी येथे गुन्हा क्रमांक 02/2025 कलम 309(4) 3(5) बीएनएस प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला असून नमूद गुन्ह्यात आरोपीला अटक करून न्यायालयासमोर हजर केले असता मा. न्यायालयाने नमूद आरोपीला तीन दिवसाचीपोलीस कोठडी सुनावली आहे.
सदरची कारवाई पोलीस अधीक्षक सोमय मुंडे,अप्पर पोलीस अधीक्षक डॉक्टर अजय देवरे, उपविभागीय पोलीस अधिकारी (लातूर शहर)रणजीत सावंत यांचे मार्गदर्शनात पोलीस ठाणे एमआयडीसी चे पोलीस निरीक्षक सुधाकर देडे यांचे नेतृत्वात पोलीस उपनिरीक्षक प्रशांत सिंग राजपूत, पोलीस अमलदार भोसले, प्रशांत ओगले, माने, दीपक सोनकांबळे यांनी केली आहे.
0 Comments