विंधन विहीर अधिग्रहणाचे पैसे शेतकऱ्यांना तात्काळ द्यावेत अन्यथा आंदोलन- प्रा. मिरगाळे
मुख्य संपादक द्रोणाचार्य कोळी
9832041174
निलंगा : निलंगा तालुक्यातील फेब्रुवारी- मार्च 2024 मध्ये पिण्याच्या पाण्यासाठी अधिग्रहण केलेल्या 217 शेतकऱ्यांच्या विंधन विहीरीचे पैसे तात्काळ द्यावे अशा आशयाचे निवेदन युवासेनेचे उपजिल्हाप्रमुख प्रा. अण्णासाहेब मिरगाळे यांनी गटविकास अधिकारी यांना दिले आहे.
निलंगा तालुक्यातील फेब्रुवारी-मार्च 2024 मध्ये जवळपास 217 शेतकऱ्यांच्या विहीर आणि विंधन विहीरी गावातील लोकांना पिण्याच्या पाण्यासाठी प्रशासनाकडून अधिग्रहण करण्यात आले होते. या शेतकऱ्यांनी स्वतःच्या पिकाला पाणी न देता गावातील लोकांसाठी पीण्याच्या पाण्याची सोय करून दिली. प्रशासनाने अधिग्रहण करून एक वर्ष झाले असताना सुद्धा आजतागायात अधिग्रहित विहीर व बोरचे पैसे शेतकऱ्यांना मिळालेले नाहीत. यावर्षी शेतकऱ्यांचे अतिवृष्टीने अतोनात नुकसान झालेले असून प्रशासनाने शेतकऱ्याचा अंत पाहू नये. तरी गटविकास अधिकारी साहेबांनी तात्काळ शेतकऱ्यांचे पैसे द्यावेत अन्यथा शिवसेना व युवासेनेच्या वतीने तीव्र आंदोलन करण्यात येईल असा इशारा युवा सेनेचे उपजिल्हाप्रमुख प्रा. अण्णासाहेब मिरगाळे यांनी गटविकास अधिकारी यांना दिला आहे निवेदन देताना सोबत पांडुरंग लादे, तुकाराम यादव, अमित मुळजे, समाधान स्वामी, मनोज बेलकुंदे, बालाजी मिरगाळे इत्यादी शेतकरी उपस्थित होते.
0 Comments