Hot Posts

6/recent/ticker-posts

पानचिंचोली आरोग्य केंद्राचा भोंगळ कारभार

पानचिंचोली आरोग्य केंद्राचा भोंगळ कारभार 

वैद्यकीय अधिकारी आरोग्य केंद्रात मुक्कामास राहतच नाहीत 

जिल्हा वैद्यकीय आरोग्य अधिकारी लक्ष देणार का? 


मुख्य संपादक द्रोणाचार्य कोळी 

9822041174


निलंगा : निलंगा तालुक्यातील पान चिंचोली हे आरोग्य केंद्र कायमच वादाच्या भवऱ्यात असते काही दिवसापूर्वी आरोग्य केंद्रात ॲम्बुलन्स असून बंद अवस्थेत आहे तर आरोग्य केंद्रात स्वच्छता नाही आणि वैद्यकीय अधिकारी मुक्कामास राहत नाहीत यासाठी विठ्ठल जाधव यांनी उपोषण केले होते परंतु उपोषण होऊन दहा दिवस सुद्धा झाले नसतील तर येथील वैद्यकीय अधिकारी आकडे हे सकाळी दहा वाजताच नाताळ हा सण आहे म्हणून निघून गेले येथील कर्मचाऱ्यांना विचारणा केली डॉक्टरची पाठराखण करत डॉक्टर कॉटरवर आहेत असं सांगितले परंतु प्रत्यक्षात असे दिसून आले नाही 

यावेळी छावाचे तालुकाध्यक्ष दास साळुंखे यांनी या घटनेची पोलखोल करत डॉक्टरांची चांगलीच हजेरी घेतली यावेळी डॉक्टरांनी यावेळेस माफ करा यापुढे असं होणार नाही असं सांगितलं 

परंतु प्रश्न असा आहे की इमर्जन्सी सेवा असलेल्या पांनचींचोली  आरोग्य केंद्रामध्ये डॉक्टरांचा मात्र कायम हलगर्जीपणा असल्याचा दिसून येत आहे.

काल रात्री नऊ वाजता एक पेशंट एक तास आरोग्य केंद्राच्या पायरीवरच बसून होता परंतु तेथे डॉक्टर नसल्यामुळे त्या पेशंटला प्रायव्हेट हॉस्पिटल मध्ये जाऊन आपला इलाज करावा लागला 

त्यामुळे पान चिंचोली आरोग्य केंद्र हे मात्र शोभेचीच वस्तू दिसून येत आहे का असा सवाल आता निर्माण झाला आहे

याबाबत जिल्हा वैद्यकीय अधिकारी बालाजी शिंदे यांना विचारणा केले असता त्यांनी कामात कुचराई करणारा वर कडक कारवाई केली जाईल असे सांगितले

Post a Comment

0 Comments