Hot Posts

6/recent/ticker-posts

कासार शिरसीत शासकीय कार्यालयासाठी कोणत्याही शेतकऱ्याची जमीन संपादित केली नाही - तहसीलदार कुलकर्णी

 कासार शिरसीत शासकीय कार्यालयासाठी कोणत्याही शेतकऱ्याची जमीन संपादित केली नाही

 तहसीलदार प्रसाद कुलकर्णी यांची माहिती 




मुख्य संपादक द्रोणाचार्य कोळी 

9822041174

कासार सिरसी :शहरालगत असलेल्या सोनामाता डोंगर परिसरात उपलब्ध गायरान जमिनीवर शासकीय कार्यालये उभारणीस जागा उपलब्ध करून देत असताना प्रशासनाने कोणत्याही शेतकऱ्यावर अन्याय केला नसून नियमाप्रमाणे गायरान जमीन सर्वे नंबर 170 मधील जमिनी पैकी चार 4 एकर 20 गुंठे जमीन ताब्यात घेतली असल्याची माहिती निलंगा येथील तहसीलदार प्रसाद कुलकर्णी यांनी दिली 

कासार शिरसी च्या गायरान जमिनी शेजारी हसूरी तालुका निलंगा येथील शेतकरी राजकुमार बाबुराव नेलवाडे यांची सर्वे नंबर 78 मध्ये जमीन आहे सध्या प्रशासकीय कार्यालये उभारणीसाठी जमीन संपादन करण्यात येत आहे या अंतर्गत गायरान जमिनी

शेजारी असलेल्या शेतकऱ्यांच्या जमिनी संपादित करण्यात येऊ नये यासाठी राजकुमार बाबुराव नेलवाडे यांनी निलंगा न्यायालयात दाद मागितली होती 

शेतकऱ्यांच्या जमिनी हस्तांतरित करू नये असा न्यायालयाने निकाल दिला असून त्या आदेशानुसार परवा प्रशासनाने कासार शिरसीत उपलब्ध गायरान जमिनी पैकी शिल्लक सर्वे नंबर 170 मधील चार एकर 20 गुंठे जमीन मापून मायना मोकाक करून ताब्यात घेतली आहे याचा विपर्यास करण्यात आला होता पण नियमाप्रमाणे आम्ही जमीन ताब्यात घेतले असल्याची माहिती निलंगा येथील कार्यकारी न्याय दंडाधिकारी यांनी पत्रकारांना दिली

Post a Comment

0 Comments