Hot Posts

6/recent/ticker-posts

मुख्यमंत्री लाडकी बहीण योजनेत प्रशासनास विधवा परितक्त्या अपंग निराधार बहिणींचा विसर

 मुख्यमंत्री लाडकी बहीण योजनेत प्रशासनास विधवा परितक्त्या अपंग निराधार बहिणींचा विसर 

 


मुख्य संपादक द्रोणाचार्य कोळी 

9822041174


श्याम मुळजकर

कासार सिरसी : सुपरहिट बनलेल्या मुख्यमंत्री माजी लाडकी बहीण या योजनेसह राज्यात घोषणांचा महापूर ओसंडत असला तरी सध्याच्या सरकारला अनेक वर्षापासून अल्प मानधनावर समाधान मानणाऱ्या असंख्य अशा विधवा परितक्त्या अपंग निराधार बहिणींचा विसर पडला असून आम्ही मुख्यमंत्र्यांच्या लाडक्या बहिणी नाहीत का असा संतप्त सवाल या लाभार्थी महिलांकडून व्यक्त करण्यात येत आहे 

मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण या योजनेअंतर्गत सन्मानित करण्यात येत असलेल्या सर्व महिला या सुस्थितीत असून कोणीही यात विधवा अपंग किंवा निराधार नाही असे असताना सुद्धा याच बहिणींना लखपती दिदी करण्याचे उद्दिष्ट ठेवण्यात आले आहे या उलट संजय गांधी निराधार योजनेअंतर्गत तुटपुंजा लाभ घेत अनेक विधवा महिला पतीशिवाय कसे जीवन जगत आहेत ज्या महिला निराधार आहेत अपंग आहेत परितक्या आहेत यांची उपजीविका कशी चालते याचा सरकारला विसर पडला आहे अशी खंत व्यक्त करण्यात येत असून संजय गांधी निराधार योजनेअंतर्गत लाभ घेणाऱ्या महिलांच्या मानधनात शासनाने दुपटीने वाढ करावी अशी मागणी करण्यात येत आहे

Post a Comment

0 Comments