जयहिंद लोकसंचालित साधन केंद्र लातूर पूर्व ची 13 वी वार्षिक सर्वसाधारण सभा संपन्न
मुख्य संपादक द्रोणाचार्य कोळी
9822041174
लातूर: दिनांक 14 सप्टेंबर 2024 रोजी मुख्यमंत्री माहिला सशक्तीकरण अभियान जाणीव जागृती कार्यक्रम उत्साहाने पार पडला, सभेस उपस्थित प्रमुख पाहुणे मा.सरोज पवार व कार्यक्रम अध्यक्ष CMRC च्या अध्यक्ष कोमल भारती , माविम जिल्हा कार्यालय लातूर चे. जिल्हा समन समन्वयक अधिकारी श्री पटेल मन्सूर सह्ययक जिल्हा समनव्य अधिकारी श्री टेकाळे जिल्हा ग्रामोद्योग विभाग लातूर चे माने सर HDFC बँक व्यवस्थापक संदीप सर SBI RESETI चे सतीश कांबळे यांनी व्यवसाया संदर्भात मार्गदर्शन केले. CMRC कार्यकारिणी, CMRC व्यवस्थापक, लेखापाल, सहयोगिणी CRP स्टाफ उपस्थित होते, उपस्थित सर्व मान्यवरांनी महिलांना मार्गदर्शन केले. सरोज पवार यांनी महिलांना स्व संरक्षण या विषयावर मार्गदर्शन केले, माने यांनी विश्वासकर्मा योजना विषयी माहिती दिली टेकाळे यांनी यशस्वनी पोर्टल संदर्भात माहिती दिली पटेल यांनी कर्ज परतफेड LOSKAPPA, मायक्रो लेखा, मुख्यमंत्री लाडकी बहीण योजना इ माहिती दिली तसेच CMRC तर्फे उत्कृष्ट CRP,उत्कृष्ट VO,व उद्योजक महिलांना भेट वस्तू देऊन गौरविण्यात आले,कार्यक्रमाचे प्रास्ताविक व्यवस्थापक सविता पाटील यांनी केले. अहवाल वाचन विजय लोंढे यांनी केले सूत्रसंचलन सहयोगिनी एन.आर.कांबळे यांनी केले भोजन व्यवस्था सर्व स्टाफ, CRP, कार्यकारणी सदस्य यांनी केले आभार प्रदर्शन सहयोगिनी आलुरे यांनी केले. यावेळी बचत गटातील मोठय़ा संख्येने उपस्थित होत्या.
0 Comments