Hot Posts

6/recent/ticker-posts

उत्कृष्ट कलाआविष्कारांचे सादरीकरण करत कासार शिरशीत लाडक्या गणरायास निरोप

 उत्कृष्ट कलाआविष्कारांचे सादरीकरण करत कासार शिरशीत लाडक्या गणरायास निरोप



मुख्य संपादक द्रोणाचार्य कोळी 

9822041174

कासार सिरसी: कासार शिरसी उत्कृष्ट कलाआविष्कारांचे सादरीकरण करत कासार शिरशीत लाडक्या गणरायास निरोप अनेक सार्वजनिक गणेश मंडळांसह येथील ज्ञान संस्कार केंद्राच्या वतीने उत्कृष्ट पथदर्शनासह शिस्तबद्ध मिरवणुका विविध वेशभूषा टाळा मृदुंगाच्या गजरासह ज्ञानेश्वर संत तुकाराम मुक्ताबाई जनाबाई संत मीराबाई यांच्या वेशभूषा तिरंगा ध्वज वारकरी पताका भारत मातेची प्रतिमा व संविधान प्रतिमेस सर्वधर्मसमभावाचे शिस्तबद्ध संचलन करत निघालेल्या या बाप्पाच्या विसर्जन मिरवणुकी ने सर्वांचे लक्ष वेधले व यातूनच खऱ्या ज्ञान संस्काराची निर्मिती अवतरली. 

प्रति वर्षाप्रमाणे याही वर्षी कासार शिरशी शहरात गणेश उत्सव उत्साहात व शांततेत संपन्न झाला येथील गांधी चौक गणेश मंडळाच्या वतीने रांगोळी स्पर्धा रक्तदान शिबिर तर काही मंडळाच्या वतीने विविध गुण दर्शनाचे सादरीकरण करण्यात आले तर महाप्रसादाने यंदाच्या उत्सवाची सांगता करण्यात आली. 

यानिमित्त येथील शिवाजी चौकात गणेश मंडळाच्या वतीने पथनाट्यांचे सादरीकरण करण्यात आले या मिरवणुकीत हनुमान गणेश मंडळ नवी पेठ व्यापारी गणेश मंडळ राजीव गांधी गणेश मंडळ चन्नवीरेश्वर गणेश मंडळ बाल गणेश मंडळ गवळी गल्ली गणेश मंडळ वीरशैव ककैया बाल गणेश मंडळ लोकमान्य सार्वजनिक गणेश मंडळाने आपला सहभाग नोंदवला या विसर्जन मिरवणुका पाहण्यासाठी चौकात चौकातून नागरिकांनी मोठी गर्दी केली होती लातूर जिल्हा काँग्रेस पक्षाचे अध्यक्ष श्री शैल्य अप्पा उटगे यांच्या हस्ते ठिकठिकाणी गणपती समोर महारतीने या उत्सवाची सांगता करण्यात आली हा उत्सव शांततेत पार पडावा यासाठी शांतता कमिटीचे सर्व पदाधिकारी व्यापारी व पोलीस प्रशासनाने विशेष परिश्रम घेतले

Post a Comment

0 Comments