रामलिंग मुदगड येथील जिल्हा परिषद शाळेत नागपंचमी निमीत्त सर्प प्रबोधन कार्यक्रमाचे आयोजन
मुख्य संपादक द्रोणाचार्य कोळी
9822041174
निलंगा: निलंगा तालुक्यातील रामलिंग मुदगड येथील जिल्हा परिषद प्राथमिक शाळेत नागपंचमी निमित्त सर्प प्रबोधन कार्यक्रम घेण्यात आला, यामध्ये सर्व सापांची माहिती सांगण्यात आली . साप हा मानवाचा शत्रू नसून तो मित्र आहे , साप हे निसर्गातील बेडूक उंदीर सरडे पाली असे असंख्य उपद्रवी प्राण्यावर नियंत्रण ठेवण्याचे काम साप हे करत असतात . वाढती लोकसंख्या व जंगलतोड यामुळे साप हे मानवी वस्तीत आढळत आहेत. साप दिसल्यास मारू नका सर्पमित्रांना फोन करा सापाचे विष हे कर्करोग कॅन्सर अशा कितीतरी जीवघेण्या रोगांवर रामबाण उपाय ठरलेला आहे , त्यासाठी साप जगणं ही काळाची गरज आहे . त्याशिवाय सर्पदंश झाल्यास सापाच्या विषापासून बनलेलीच लस तुम्हाला दिली जाते, त्यामुळे तुमचा प्राण वाचतो अनावधानाने सर्पदंश झाल्यास ताबडतोब दवाखान्यातच जा मांत्रिक तांत्रिक जडीबुटी यावर विश्वास ठेऊ नका , आपल्या भागात 25 जातीचे साप आढळतात नाग,मण्यार,घोणस, फुरसे व पोवळा हे पाच विषारी साप आपल्या भागात सापडतात , श्रावणात प्रत्येक सापाची पिल निसर्गात आढळतात त्यांना आश्रय मिळावा म्हणून नागपंचमी हा सण साजरा केला जातो , व नागाची पूजा केली जाते .
निसर्गातील प्रत्येक जीव जगला पाहिजे आणि तो त्यांचा अधिकार आहे असे सर्पमित्र अनिल गरुड यांनी सांगितले , या कार्यक्रमासाठी शाळा व्यवस्थापन समितीचे अध्यक्ष राजकुमार आत्तिकर , सर्पमित्र वैभव गरुड , ओमप्रकाश बिराजदार , कटेवाड मॅडम व सुवर्णकर मॅडम व शाळेतली विद्यार्थ्यांची उपस्थिती होती.
0 Comments