Hot Posts

6/recent/ticker-posts

नागपंचमी निमित्त महिलांनी केली नाग राजांची मनोभावें पूजा मुख्य संपादक द्रोणाचार्य कोळी

 नागपंचमी निमित्त महिलांनी केली नाग राजांची मनोभावें पूजा 

   


मुख्य संपादक द्रोणाचार्य कोळी 

9822041174



लातूर: श्रावण शुद्ध पंचमीला नागपंचमी  साजरी केली जाते.श्रावणाला प्रथम सण म्हणजेच नाग पंचमी. शेतासहधन, धान्याचे रक्षक असलेल्या नागदेवतेची आज नागपंचमीला बळी राजासह महिलांनी भाविक मनोभावे उपासना करणार आहेत. उंदीर इतर कीटक हे शेतातील पिकांची मोठ्या प्रमाणात नासाडी करीत असतात. अशांचा बंदोबस्त नागाच्या उपस्थितीमुळे आपोआपच होतो. बहुतांश शेतात नाग, सर्प आढळतात. त्यामुळे सहजच त्या शेताकडे फिरकण्याची कोणाचीही हिंमत होत नाही. त्यामुळेच नागाला शेताचा रक्षक मानून बळीराजा त्यांची पूजा करीत असतात. 

 शेतकऱ्यांसह महिलाही हा सण आनंदाने साजरा करतात. घर, शेत, संपत्तीचे रक्षण करावे म्हणून नागच्या मूर्तीची पूजा केली जाते. पूर्वी  वारुळाजवळ जाऊन पूजा करायचे. आता मात्र वारुळे फारच कमी दिसतात. मंदिरातील धातुची नागाची मूर्ती बनवून तिची पूजा केली जाते.नागाच्या मूर्तीला हळद-कुंकू लावून, दुर्वाफुले वाहून , लाह्या दुधाचा नैवेद्य दाखवून पूजा केली . कुळ, पूर्वज आणि घराण्याचा रक्षणकर्ता म्हणूनही नागाची पूजा केली जाते. या दिवशी नागाच्या फण्याला दुखवायचे नसते, अशी मान्यता आहे.

Post a Comment

0 Comments