Hot Posts

6/recent/ticker-posts

लातूर जिल्ह्यातील अनेक भागांत जागतिक आदिवासीं दिन साजरा

लातूर जिल्ह्यातील अनेक भागांत जागतिक आदिवासीं दिन साजरा 

असंख्य आदिवासी समाज एकवटला




मुख्य संपादक द्रोणाचार्य कोळी 

9822041174





लातर: जागतिक आदिवासी दिनानिमित्त लातूर जिल्ह्यातील अनेक गावागावात रॅलीचे आयोजन करण्यात आले. पारंपारिक वेशभुषा, नृत्यांचे सादरीकरण करीत असंख्य आदिवासी समाज या निमित्ताने एकवटला.  शहरात आणि ग्रामीण भागात रॅली काढण्यात आली. या रॅलीला उत्स्फुर्त प्रतिसाद मिळाला. आदिवासींच्या हक्काचे समर्थन व संरक्षण करण्याबरोबरच जागरुकता वाढविण्यासाठी जागतिक आदिवासी दिन साजरा केला जातो. यंदाही  मोठ्या उत्साहाने जागतिक आदिवासी दिन साजरा करण्यात आला. निलंगा, दादगी, भंगार चिंचोली, लिंबाळा, तसेच औसा, उदगीर, चाकुर आदीं तालुक्यांतील अनेक भागांत जागतिक आदिवासी दिन साजरा करण्यात आला.बिरसा मुंडा यांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण करून रॅली काढण्यात आली. 

 पारंपारिक वाद्यांचे सादरीकरण करण्यात आले. आदिवासी गीतांचेदेखील सादरीकरण करीत आदिवासी समाजाचे महत्व जनतेपर्यंत पटवून देण्याचा प्रयत्न करण्यात आले. एक वेगळा उत्साह या निमित्ताने प्रत्येकाच्या चेहर्‍यावर दिसून आला. तरुणांसह महिला, ज्येष्ठ नागरिक,विदयार्थी यांनी मोठ्या उत्साहाने आदिवासीं दिन साजरा करण्यात सहभागी झाले होते. जणू काही उत्सवच साजरा होत असल्याचे दिसून आले.

Post a Comment

0 Comments