Hot Posts

6/recent/ticker-posts

आदिवासी कोळी समाजाच्या मागणीसाठी लातूर जिल्हाधिकारी कार्यालयासमोर आमरण उपोषण

 आदिवासी कोळी समाजाच्या मागणीसाठी लातूर जिल्हाधिकारी कार्यालयासमोर आमरण उपोषण



मुख्य संपादक : द्रोणाचार्य कोळी 

9822041174


लातूर: सोमवार दिनांक १२ ऑगस्ट रोजी लातूर जिल्हाधिकारी कार्यालया समोर आदिवासीं कोळी समाजाच्या मागणीसाठी अखिल भारतीय आदिवासीं वाल्मीकी संघटनेचें संस्थापक अध्यक्ष माननीय विशाल भाऊ सुर्यवंशी  आमरण उपोषणास बसले आहेत.

कोळी समाजाच्या विविध मागण्या संदर्भात मराठवाड्यातील आदिवासी कोळी ,टोकरे कोळी, ढोर कोळी, महादेव कोळी, मल्हार कोळीचे जातीचे दाखले कोळी नोंदी वरून सरसकट मिळावेत. ज्या आदिवासी कोळी समाज बांधवांना जात वैधता प्रमाणपत्र मिळाले आहे. त्यांच्या रक्ताच्या नात्यातील व्यक्तीना कोणतेही कागदपत्र न मागता जात वैधता प्रमाणपत्र मिळावे, यासह इतर सामाजिक विविध मागण्यांसाठी आदिवासी कोळी समाजातर्फ आमरण उपोषणाला बसले आहेत.

यावेळी आदिवासी कोळी समाजाच्या विविध  मागण्या शासनाकडे निवेदनाद्वारे करण्यात आल्या आहेत. यात खालील मागण्यांचा समावेश आहे.


१) विनाअट आदिवासी कोळी समाजातील टोकरे कोळी, ढोर कोळी, महादेव कोळी, मल्हार कोळी चे जातीचे दाखले कोळी नोंदी वरून सरसकट मिळावेत.

२) ज्या आदिवासी कोळी समाज बांधवांना जात वैधता प्रमाणपत्र मिळाले आहे. त्यांच्या रक्ताच्या नात्यातील व्यक्तीना कोणतेही कागदपत्र न मागता जात वैधता प्रमाणपत्र मिळावे.

३) आदिवासीं संचालक कै. गोविंद गारे व मधुकर पिचड यांच्या निकशानुसार समान न्यायाने विस्तारित क्षेत्रातील कोळी महादेव कोळी मल्हार जमातीला जात वैधता प्रमाणपत्र देण्यात यावे.

४) जात पडताळणी समितीच्या वतीने सुरू असलेली तपासणी तात्काळ थांबवावी.

५) शालेय विद्यार्थ्यांसाठी व्यावसायिक अभ्यासक्रमासाठी वैधताबाबत काढलेले शासन परिपत्रक रद्द करण्यात यावे.

६) तालुका स्तरावर उपविभागीय अधिकारी यानी निर्गम उतारा व पालकांची जात प्रमाणपत्र या पुराव्यावरून जातीचे प्रमाणपत्र देण्यात यावे. 

७) कोळी समाजाला बोगस म्हणून एकेरी उल्लेख केलेल्या राजेन्द्र भारुड यांच्यावर तात्काळ गुन्हा नोंद करून त्यांना सेवेतून बडतर्फ करण्यात यावे यासह अनेक कोळी समाजाच्या मागण्यांसंदर्भात उपोषण करण्यात येणार असल्याची माहिती प्रतिनिधींनी दिलेल्या माहितीनुसार प्राप्त झाली आहे.

Post a Comment

0 Comments