Hot Posts

6/recent/ticker-posts

लातूर जिल्हाधिकारी कार्यालया समोर कोळी समाजाचेचार दिवसांपासून उपोषण, एकाची प्रकृती खालावली

 लातूर जिल्हाधिकारी कार्यालया समोर कोळी समाजाचे चार दिवसांपासून उपोषण, उपोषण कर्त्यांची प्रकृती खालावली



मुख्य संपादक द्रोणाचार्य कोळी 

9822041174


लातूर : जिल्हाधिकारी कार्यालयाबाहेर अखिल भारतीय आदिवासी कोळी संघटनेचे कोळी समाजाच्या मागणीसंदर्भात  विविध मागण्यांसाठी आमरण उपोषण सुरु आहे. चौथ्या दिवशी एका उपोषणकर्त्याची प्रकृती खालावली असून अद्याप प्रशासनाचे दुर्लक्ष केले जात असल्याने, कोळी समाजाच्या वतीने तीव्र असंतोष व्यक्त करण्यात येत आहे.

जिल्हाधिकारी कार्यालयासमोर मागील चार दिवसांपासून दिवसापासून अखिल भारतीय आदिवासी वाल्मीकी संघटनेचे संस्थापक अध्यक्ष माननीय विशाल भाऊ सुर्यवंशी यांनी कोळी समाजाच्या  विविध मागण्यांसाठी आमरण उपोषण सुरू केले आहे. या आमरण उपोषनाची तात्काळ दखल जिल्हाधिकारी वर्षा ठाकूर घुगे यांनी घेऊन संबधीत तालुक्यांतील तहसीलदारांना पत्र काढले असल्याची माहिती मिळते आहे.

कोळी समाजाच्या मागण्यांबाबत जोवर शासनाकडून लेखी आश्वासन मिळत नाही, तोवर उपोषण सोडणार नाही, असा पवित्रा समाजबांधवांनी घेतला आहे.

Post a Comment

0 Comments