आदिवासीं कोळी समाजाच्या मागणीसाठी तेरणा नदीच्या पात्रात जलसमाधी आंदोलन
मुख्य संपादक द्रोणाचार्य कोळी
9822041174
निलंगा : निलंगा तालुक्यातील निलंगा कासार सिरसी महामार्गावर असलेल्या दादगी येथील तेरणा नदीच्या पात्रात कोळी समाजाच्या विविध मागण्या संदर्भात मराठवाड्यातील आदिवासीं कोळी समाजाच्या वतीने आठ तास जल समाधी आंदोलन गुरूवार दिनांक एक ऑगस्ट रोजी करण्यात आले. तब्बल आठ तास हे जलसमाधी आंदोलन सुरू होते. यामध्ये दोन कोळी समाज बांधव पाण्यात बसून आंदोलन करत राहिल्याने त्यांची प्रकृती गंभीर बिघडली असल्याकरणाने,उपचारासाठी निलंगा येथील उपजिल्हा रुग्णालयात दाखल करण्यात आले होते.
आदिवासी कोळी समाजातील टोकरे कोळी, ढोर कोळी, महादेव कोळी, मल्हार कोळी जातीचे दाखले कोळी नोंदी वरून सरसकट मिळावेत. ज्या आदिवासी कोळी समाज बांधवांना जात वैधता प्रमाणपत्र मिळाले आहे. त्यांच्या रक्ताच्या नात्यातील व्यक्तीना कोणतेही कागदपत्र न मागता जात वैधता प्रमाणपत्र मिळावे, विनाअट आदिवासी कोळी समाजातील टोकरे कोळी, ढोर कोळी, महादेव कोळी, मल्हार कोळीचे जातीचे दाखले कोळी नोंदी वरून सरसकट मिळावेत.
ज्या आदिवासी महादेव कोळी समाज बांधवांना जात वैधता प्रमाणपत्र मिळाले आहे. त्यांच्या रक्ताच्या नात्यातील व्यक्तीना कोणतेही कागदपत्र न मागता जात वैधता प्रमाणपत्र मिळावे. आदिवासीं संचालक कै. गोविंद गारे व मधुकर पिचड यांच्या निकशानुसार समान न्यायाने विस्तारित क्षेत्रातील कोळी महादेव कोळी मल्हार जमातीला जात वैधता प्रमाणपत्र देण्यात यावे. जात पडताळणी समितीच्या वतीने सुरू असलेली पूनर्व तपासणी तात्काळ थांबवावी.शालेय विद्यार्थ्यांसाठी व्यावसायिक अभ्यासक्रमासाठी वैधताबाबत काढलेले शासन परिपत्रक रद्द करण्यात यावे. तालुका स्तरावर उपविभागीय अधिकारी यानी निर्गम उतारा व पालकांची जात प्रमाणपत्र या पुराव्यावरून जातीचे प्रमाणपत्र देण्यात यावे.अशा विविध मागण्यांसह आदिवासी कोळी समाजाच्या विरोधात असलेल्या सरकारचा धिक्कार असो अशा विविध घोषणाबाजी करत दादगी येथील तेरणा नदीच्या पात्रात लातूर जिल्ह्यासह धाराशिव, बीड, परभणी, आदीं मराठवाड्यातील हजारोंच्या संख्येने पुरुष, महीला विदयार्थी,युवक आदिवासी कोळी समाज बांधव या जलसमाधी आंदोलनात सहभागी झाले होते.सकाळी आठ वाजल्यापासून कोळी महादेव समाजाचे आंदोलक नदीपात्रात सुरू केले. यावेळी जोपर्यंत आम्हाला लेखी अश्वासन मिळत नाही तोपर्यंत आम्ही आंदोलन सुरूच ठेवण्याचा निर्धार केला.अखेर उपविभागीय अधिकारी शरद झाडके, तहसिलदार प्रसाद कुलकर्णी, उपविभागीय पोलिस अधिकारी नितीन कटेकर यांनी आंदोलन स्थळी भेट देऊन आंदोलन मागे घेण्याबाबत विनंती केली.
मात्र लेखी आश्वासन दिल्याशिवाय आंदोलन मागे घेणार नाही असा पवित्रा आंदोलकर्त्यांनी घेतला होता. तसेच आंदोलन स्थळी भाजपा युवा नेते अरविंद पाटील निलंगेकर यांनी उपस्थित राहून कोळी समाजाच्या मागण्या शासन दरबारी मांडन्याचा निर्धार केला.उप विभागीय अधिकारी यांना जातीचे प्रमाणपत्र तत्काळ देण्यात यावे अन्यथा मी या समाजासोबत आहे.
कोणत्या पक्षाचा नेता म्हणून नव्हे तर एक नागरीक म्हणून तुमच्या सोबत असेन शिवाय मराठवाड्यातील जातीचे प्रमाणपत्र, जातवैधता प्रमाणपत्राबाबता लवकरच मुख्यमंत्र्याना बोलून लवकरच तोडगा काढण्यासाठी प्रयत्न करू असे अश्वासन यावेळी दिले. काँग्रेसचे सचिव अभय सोळुंके यांनीही या आंदोलनाला भेट देवून पाठींबा दिला. उपविभागीय अधिकारी शरद झाडके, तहसीलदार प्रसाद कुलकर्णी, नायब तहसीलदार प्रविण आळंदकर यांनी निवेदन स्विकारून लेखी अश्वासन दिले.यावेळी पोलीसांनी मोठा पोलिस बंदोबस्त लावला होता. ग्रामीण भागातील महीला, युवक शालेय विध्यार्थी, जेष्ठ नागरीक, हातामध्ये झेंडे घेऊन डोक्यावर टोप्या घालून आंदोलनात सहभागी झाले होते. या आंदोलनात अनुचित प्रकार घडू नये म्हणून अँब्युलन्सह वैद्यकीय पथक आपत्ती व्यवस्थापन एनडीआरएफ पथक, पोलिस अधिकारी, मोठ्या संख्येने उपस्थित होते.
यावेळी अनेक शालेय विद्यार्थ्याची जात वैधता मिळत नसल्याने अडचणीचा सामना कसा करावा लागतो, याचे विश्लेषण केले.प्रत्येकांचे जात प्रमाणपत्र अवैध केले जाते त्यांना उच्च न्यायालयात दाद मागावी लागते अशा व्यथा मांडल्या. हजारो कोळी महादेव समाज या आंदोलनात सहभागी झाला होता.
या आंदोलना दरम्यान चार ते पाच समाज बांधव बुडत होते त्यांना समाजाचे पोहणारे व एनडीआरएफच्या टिमने बाहेर काढले. त्यातील दोघांना निलंगा येथील उपजिल्हा रूग्णालयात दाखल केले आहे.
आमच्या समाजाला न्याय द्या अनेक वर्षापासून हा प्रश्न आदिवासी आमदाराच्या दबावा पोटी सुरू असून मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री अजित पवार, देवेंद्र फडणवीस यांच्या फोटोचे बॕनर पाण्यात बुडवून निषेध व्यक्त केले.
आठ दिवसात प्रश्न नाही सुटल्यास पुन्हा आंदोलन तिव्र करणार : चंद्रहंस नलमले
आम्हाला जातीचे दाखले तात्काळ देवू म्हणून उपजिल्हाधिकारी यांनी लेखी अश्वासन दिले आहे. त्यामुळे तात्पुरते आंदोलन स्थगित केले असून, जातपडताळणीसाठी मुख्यमंत्र्यानी आदीवासी विभागाची बैठक लावून रक्त नात्याचा शासन परिपत्रक काढावे, कोळी हेच महादेव कोळी, मल्हार कोळी आहेत हे मान्य करावे अन्यथा आणखी तिव्र आंदोलन करू असा ईशारा सकल आदिवासी महादेव समाज कोळी मल्हार समाजाचे नेते यांनी यावेळी सांगितले.
0 Comments