किल्लारी येथिल निळकंठेश्वर यात्रा महोत्सवास प्रारंभ
आकरा दिवस चालणार विविध धार्मिक उपक्रम,
मुख्य संपादक: द्रोणाचार्य कोळी
9822041174
किल्लारी : पंचक्रोषित प्रसिद्ध असलेल्या किल्लारी तीर्थक्षेत्र श्री निळकंठेश्वर यात्रा महोत्सवास मंगळवार ( ता. २० ) पासून प्रारंभ होत असून शुक्रवार ( ता. ३० ) ऑगस्टपर्यंत सुरु राहणार आहे. मंदिरावर आकर्षक विद्युत रोषणाई करण्यात आली आहे.
सकाळी गावातून पालखी निघून ईश्वरढव ( राजेंगांव शिवारात ) येथील पिंडीला भेटऊन तीर्थक्षेत्र मंदिरात ११ दिवस सप्ताह भरविला जातो. माजी राज्यमंत्री बसवराज पाटील, आ. अभिमन्यू पवार यांच्या हस्ते महापूजेने सप्ताह व यात्रा शुभारंभ होणार आहे. यावेळी आ. सिद्धू पाटील, अर्चनाताई पाटील, सरपंच सुलोचना बाबळसुरे आदींची उपस्थिती राहणार आहे.
या दरम्यान भव्य यात्रा भरते. दररोज काकडारती, भजन, कीर्तन, हरिपाठ, जागर, प्रवचन आदी धार्मिक, सामाजिक कार्यक्रम होणार आहेत.
मंगळवारी भागवताचार्य निलेश महाराज चव्हाण, बुधवारी (दि .२१) दिलीप देशमुख महाराज, गुरुवारी ( दिं.२२) अनंत माने महाराज चाडगावकर, शुक्रवारी ( ता. २३) चैतन्य महाराज राऊत, शनिवार ( ता. २४ ) सार्थक महाराज गायकवाड, रविवार ( ता. २५ ) साध्वी मुक्ताई नाथ माऊली भोकर, सोमवार ( ता. २६) निवृत्ती देशमुख महाराज इंदुरीकर, मंगळवार (ता २७ ) नेहा भोसले पुणे, बुधवार ( ता. २८) रोहिणाताई परांजपे, गुरुवार ( ता. २९) शिवलीलाताई पाटील यांचे दररोज रात्री नऊ वाजता कीर्तन होणार आहे. शुक्रवार ( ता. ३०) ऑगस्ट रोजी हभप कृष्णा महाराज यांचे सकाळी ८ वाजता भारुड होणार आहे. दुपारी १२ वाजता महाआरतीनंतर चार किलोमीटर पालखी मिरवणूकीने यात्रेची सांगता होणार आहे.
यशस्वीतेसाठी अध्यक्ष अशोक गावकरे, उपाध्यक्ष प्रकाश पाटील, चंद्रकांत बाबळसुरे, मनोहर गवारे, सुभाष लोहार, नामदेव माळवदे, प्रकाश पाटील, निळकंठ बिराजदार, देवीदास मिरकले, राजेंद्र जळकोटे, प्रशांत गावकरे, संजय गावकरे, बिसरसिंग ठाकूर, अंकुश भोसले, भारत बोळशेट्टे, गोविंद भोसले, जितेंद्र शिंदे, राजू बिराजदार, खंडू बिराजदार, गुरव समाजाच्या वतीने यावर्षीचे सालाचे मानकरी बाबुराव शिवराम गुरव, अनिल पुजारी व त्यांचे सहकारी आदी परिश्रम घेतात.
या आहेत सुविधा
दर्शन मंडप, दर्शन रांगा, दुपारचे महाप्रसाद व्यवस्था, वाहन तळाची व्यवस्था, रक्तदान, नेत्रचिकित्सा व शस्त्रकिया शिबर तसेच प्राचीन व दुर्मीळ वस्तूंचे प्रदर्शन होणार आहे. दर्शन मंडप, दर्शन रांगा, प्रासादिक दुकाने, खेळणी स्टॉल, पाळणा, ब्रेक डान्स, मौत का कुवाँ, पाणी, मोफत वाहन स्थळ, किल्लारी पाटी ते मंदिरापर्यंत तीन किमी मोफत सेवेचे नियोजन सूर्यकांत बाळापुरे, बालाजी चव्हाण, जनार्धन डुमने करीत आहेत. मंदिर समितीच्या वतीने जय्यत तयारी करण्यात आली आहे.
0 Comments