रामलिंगेश्वर मंदिरात सत्कार सोहळा संपन्न
मुख्य संपादक द्रोणाचार्य कोळी
9822041174
निलंगा : रामलिंग मुदगड येथे श्री प्रमोद नानासाहेब देशमुख पी. एस आय, मोहन पालमपल्ले पी एस आय, कुमारी बकुळा कांबळे पो. काँ.यांचा यथोचित सत्कार करण्यात आला. कार्यक्रमाच्या अध्यक्ष स्थानी रामलिंग मुदगड चे हृदयरोगतज्ञ श्री . डॉ.बजरंग दुबे व शिवसेना प्रणित शेतकरी सेनेचे जिल्हाध्यक्ष श्री बालाजी गोडसे पाटील व बजरंग दादा जाधव तसेच उमेश भैय्या उमापुरे व राजेंद्र गोरे का.सिर्सी पोलिस स्टेशनचे श्री राठोड साहेब हजर होते . प्रथम रुस्तुम- ए- हिंद हरिश्चंद्र बिराजदार यांच्या प्रतिमेला पुष्पहार घालून वंदन करण्यात आले . व कार्यक्रमाला सुरुवात झाली , या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन श्री महादेव म्हेकरे सर्व मान्यवरांचे शाल श्रीफळ पुष्पहार फेटा व रामलिंगेश्वराची प्रतिमा देऊन सन्मान करण्यात आला . हा कार्यक्रम जय हनुमान सेवाभावी संस्थेचे अध्यक्ष श्री मधुकर बिराजदार PSI , श्री दशरथ मुळे, श्री जीवन बिराजदार, जगन्नाथ बिराजदार , किरण नाकाडे, बालाजी नाकाडे , मल्लिकार्जुन बिराजदार व गावातील नागरिक यांनी आतिशय सुंदर रित्या पार पाडले. अध्यक्षीय भाषणात श्री दुबे , पालमपल्ले ,देशमुख व कांबळे यांनी असे सांगितले की मुलांना चांगले शिक्षण द्या , चांगले संस्कार करा परिस्थिती चा विचार करू नका , शिक्षण हे वाघणीचे दूध आहे जो प्राशन करतो तो गुरगुरल्याशिवाय राहणार नाही जिद्द आणि चिकाटी झाली तर आपण ध्येय डोळ्यासमोर ठेऊन वाटचाल करावी , व मुलींना प्रत्येक क्षेत्रात प्रोत्साहन द्यावे . मुलगा आणि मुलगी यांचा भेदभाव मानू नये . शिक्षण घा अभ्यास करा आपण प्रत्येक क्षेत्रात शंभर टक्के यशस्वी व्हाल जिद्द सोडू नका . कार्यक्रमाचा समारोप करताना परिस्थिती ला तोंड देऊन यश संपादन करा असे उमेश भैय्या उमापुरे यांनी सांगितले , व नंतर सर्व गावकऱ्यांना प्रसाद वाटप करण्यात आला. या कार्यक्रमासाठी सर्पमित्र अनिल गरुड , पत्रकार श्री मुळजकर व मडोळे हे हजर होते .
0 Comments