Hot Posts

6/recent/ticker-posts

कासार सिरसी सह परिसरातील अनेक शाळेत संरक्षक भिंतीसह वीज पुरवठ्याचा अभाव सर्वत्र सीसीटीव्ही कॅमेरा बसवण्याची मागणी

 कासार सिरसी सह परिसरातील अनेक शाळेत संरक्षक भिंतीसह वीज पुरवठ्याचा अभाव सर्वत्र सीसीटीव्ही  कॅमेरा बसवण्याची मागणी 



मुख्य संपादक :  द्रोणाचार्य कोळी 

९८२२०४११७४


प्रतिनिधि/ श्याम मुळजकर 

कासार सिरसी: कासार सिरसीसह  परिसरात तेरा जिल्हा परिषद शाळा व तेरा माध्यमिक विद्यालये असून, या अंतर्गत येणाऱ्या सर्वच शाळेपैकी कासार सिरसी येथील श्री करी बसवेश्वर माध्यमिक उच्च माध्यमिक शाळा,महाराष्ट्र विद्यालय मुदगड एकोजी माध्यमिक शाळेस पक्की अशी संरक्षक भिंतच नाही तर कोराळवाडी, सिरसी वाडी व मुदगड वाडी , कोकळगाव पश्चिम येथील  प्राथमिक शाळेत संरक्षक भिंती नसल्याचे दिसून आले आहे तर कोराळी,हत्तरगा रामलिंग मुदगड, मुदगड वाडी व हलसी वाडी या चार प्राथमिक विद्यालयात विद्युत पुरवठाच नाही तसेच अनेक प्रशालेत स्वच्छतागृह नसल्याने येथील विद्यार्थ्यांना त्यांच्या सुरक्षेसह अनेक समस्यांचा सामना करावा लागत आहे. तसेच परीसरातील मदनसुरी, मुदगड ए. किल्लारी, निलंगा येथील शाळेसाठी ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांना ने आण करण्यासाठीं शाळेतर्फे असलेल्या वाहनांची तपासणी करण्यात यावी, रिक्षा, टमटम जीप आदीं पंधरा वर्षापूर्वीच्या जुनेच वाहने तात्काळ बंद करून,प्रशासनाच्या नियमावलीत बसणाऱ्या वाहनांना परवानगी देण्यात यावी. नियमबाह्य वाहनधारकांची विदयार्थी सुरक्षेसाठी योग्य कारवाई करण्यात यावी.

प्रशालेतील मुलींच्या संरक्षणासह कार्यालयीन कामकाजात सतत गैरहजर राहणाऱ्या कर्मचाऱ्यांवर अंकुश ठेवण्यासाठी सर्वत्र थंप बसवण्यात यावे असे मागणी करण्यात येत आहे 

बदलापूर येथील अल्पवयीन मुलीवर लैंगिक अत्याचाराची घटना घडल्यानंतर आता याचे संबंध राज्यासह ग्रामीण भागात तीव्र पडसाद उमटत आहे सर्वच स्तरातून या घटनेचा निषेध करण्यात येत असून सर्वच प्रशालेतील मुलींच्या सुरक्षिततेचा प्रश्न ऐरणीवर आला आहे. या घटनेनंतर जाग आलेल्या शिक्षण विभागाने  जिल्हा सह राज्यात सर्वत्र सी सी टीव्ही कॅमेरा बसवणे व सक्षम कर्मचाऱ्यांची नियुक्ती करण्याचे फर्मान काढले असले तरी ग्रामीण भागात अनेक शाळेत पक्के संरक्षक भिंती नाहीत. शाळेत  अनेक ठिकाणी विद्युत विजेचा अभाव आहे तर काही ठिकाणी शिक्षक सतत गैरहजर राहतात व पगार उचलत असतात अशा कर्मचाऱ्यांना मुख्याध्यापकांसह जिल्हा शिक्षण विभाग पाठीशी घालत आहे त्यामुळे प्रशालेतील विद्यार्थ्यांच्या संरक्षणासह शैक्षणिक प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे. प्रशालेत नियमबाह्य वागणाऱ्या कर्मचाऱ्यांची कसून चौकशी करण्यात यावी विद्यार्थ्यांच्या सुरक्षिततेसाठी शाळा इमारतीसह संरक्षित भिंत गेट व सी सी टीव्ही कॅमेरा  बसवण्यात यावेत अशी मागणी सुजाण पालक वर्गातून  करण्यात येत आहे.

Post a Comment

0 Comments