कोळी समाजाच्या मागणीसंदर्भात जिल्हाधिकारी कार्यालय लातूर येथे धरणे व मुंडण आंदोलन सुरू
मुख्य संपादक द्रोणाचार्य कोळी
९८२२०४११७४
लातूर : मराठवाड्यातील महादेव कोळी, मल्हार कोळी समाजाला सुलभतेने जातीचे प्रमाणपत्र व जात वैधता प्रमाणपत्र देण्यासाठी तत्काळ निर्णय जाहीर करून रक्त नात्यातील परिपत्रक काढावे, या मागणीसाठी सकल महादेव कोळी जमातीच्या वतीने आज ३० ऑगस्ट रोजी जिल्हाधिकारी कार्यालयासमोर धरणे व मुंडण आंदोलन करण्यात येत आहे.
मराठवाड्यातील आठही जिल्ह्यांमध्ये आदिवासी कोळी महादेव, मल्हार, डोंगरे, टोकरे या तत्सम जमातीची संख्या मोठ्या प्रमाणात आहे. परंतु या जमातीला सुलभतेने जातीचे प्रमाणपत्र व जात पडताळणी समितीकडून वैधता प्रमाणपत्र देण्यासाठी अडचणी आणल्या जात आहेत. अनुसूचित जाती व इतर मागास प्रवर्गासाठी रक्त नात्यामध्ये वैधता देण्याबाबत शासन निर्णय यापूर्वीच घेतला आहे मात्र अनुसूचित जमाती प्रवर्गासाठी रक्त नात्याचा निर्णय लागू नाही ही खेदाची बाब आहे. शिवाय कोळी नोंदीवरून आदिवासी क्षेत्रातील जमातीला सुलभतेने जात प्रमाणपत्र व वैधता प्रमाणपत्र देण्यात येते तर विस्तारीत क्षेत्राबाहेरील आदिवासी जमातीबाबत क्षेत्रबंधन उठवण्यात आले असतानाही या कार्यक्षेत्रात जाचक आटी लावल्या जात आहेत. याबाबत राज्य शासनाने ठोस निर्णय घ्यावा, या मागणीसाठी व राज्य सरकारचे लक्ष वेधण्यासाठी जिल्हाधिकारी कार्यालयासमोर आज शुक्रवारी दि. ३० ऑगस्ट रोजी एक दिवसाचे धरणे व मुंडन आंदोलन करण्यात येत आहे. या आंदोलनासाठी मराठवाड्यातील आदिवासीं कोळी समाज बांधव विदयार्थी महिला तरूण अबाल वृद्ध मोठ्या प्रमाणत एकवटला असल्याचे दिसून येत आहे.
0 Comments