अशोकराव पाटील निलंगेकर यांनी घेतली पाटील कुटुंबीयांची सांत्वनपर भेट
निलंगा: देवणी तालुक्यातील दवन हिप्परगा येथील अंबुलगा सहकारी कारखानाच्या माजी संचालिका कै.बलिकाबाई गुणवंत पाटील यांचे काही दिवसांपूर्वी ह्रदयविकाराच्या झटक्याने दुःखद निधन झाल्याने पाटील यांच्या निवासस्थानी त्यांच्या कुटुंबीयांची महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीचे सरचिटणीस मा.श्री.अशोकराव पाटील निलंगेकर साहेबांनी सांत्वन पर भेट घेतली आणि भावपूर्ण श्रद्धांजली अर्पण केली.
यावेळी देवणी तालुका काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष अजित बेळकूने, देवणी तालुकाउपाध्यक्ष धनराज चिद्रे,देवणी शहराध्यक्ष जावेद तांबोळी,सेवानिवृत्त डी.एल.कांबळे,निलंगा वि.युवक काँग्रेसचे अध्यक्ष अमोल सोनकांबळे,सचिन पाटील,प्रदीप संगणे,विष्णू पाटील,रितेश बिराजदारतसेच त्याभागातील ग्रामस्थ उपस्थित होते.
0 Comments