Advertisement

मसलगा प्रकल्प दुरुस्तीसाठी छावा करणार आंदोलन निलंगा उपविभागीय अधिकारी यांच्याकडे निवेदन

 मसलगा प्रकल्प दुरुस्तीसाठी छावा करणार आंदोलन

निलंगा उपविभागीय अधिकारी यांच्याकडे निवेदन



मुख्य संपादक द्रोणाचार्य कोळी 

9822041174


निलंगा : निलंगा तालुक्यातील मसलगा मध्यम प्रकल्पाच्या पाळूला भली मोठी भेग पडले असून दिवसेंदिवस पाळू खचत चाललेली आहे. प्रशासनाने याकडे लक्ष देऊन त्वरित दुरुस्त करावे अन्यथा छावा संघटनेच्या वतीने उपोषण करण्याचा इशारा निलंगा उपविभागीय अधिकारी यांच्याकडे निवेदनाद्वारे दिला आहे. 

एक ऑक्टोबर रोजी निलंगा उपविभागीय अधिकारी यांच्याकडे देण्यात आलेल्या निवेदनात मसलगा मध्यम प्रकल्प तात्काळ दुरुस्त करावा अन्यथा याच प्रकल्पावर आमरण उपोषणास बसणार असल्याचे निवेदनाद्वारे जाहीर करण्यात आले आहे.या निवेदनात मसलगा मध्ये प्रकल्प त्वरित दुरुस्ती करणे प्रकल्पावरील हलगर्जी करणाऱ्या अधिकाऱ्याना त्वरित बडतर्फ करावे, प्रकल्पावर सायरन बसविणे, मसलगा गावचे पुनर्वसन करणे, नदीपात्राचे खोलीकरण करणे, प्रकल्पाकडे जाणाऱ्या रस्त्याच्या रस्त्यावरील अतिक्रमण काढून डांबरीकरण करावे, तलाव क्षेत्रातील अवैद्य पाणी उपसा बंद करावा, तलावा भोवतीचे सर्व अतिक्रमणे तात्काळ काढावे अशा विविध मागण्यासाठी येत्या 6 ऑक्टोबर रोजी मसलगा मध्यम प्रकल्प स्थळावर उपोषण करण्यात येणार आहे.

या निवेदनावर छावाचे तालुकाध्यक्ष तुळशीदास साळुंके, योगेश पाटील शिराज शेख अमित देशमुख, हरीपिंड आदींच्या स्वाक्षऱ्या आहेत.

Post a Comment

0 Comments