अखिल भारती विद्यापीठ महिला दहीहंडी उत्सव
थाटात संपन्न
मुख्य संपादक द्रोणाचार्य कोळी
9822041174
सण साजरी करणारी दक्षिण पुण्यातील पहिली व एकमेव महिला दहीहंडी असून, १५ वर्षात यशस्वी पदार्पण करताना या सोहळ्यास एक विशेष महत्त्व प्राप्त झाले असल्याची माहिती युवक्रांती पोलीस मित्र संघटनेने पुणे शहर अध्यक्ष अनिल रेळेकर यांनी बोलताना दिली.तर ही खास महिलांसाठी आयोजित करण्यात येत असलेली विशेष दहीहंडी दि १६ऑगस्ट रोजी वंडर सिटी ग्राउंड,पुणे येथे ठीक संध्याकाळी सात वाजता सुरू करण्यात आली होती.दहीहंडी फोडणाऱ्या गोविंदा विजयी संघाला रुपये १,११,१११ /- इतके रोख बक्षीस, सन्मानचिन्ह बहाल करण्यात आले.या कार्यक्रमाला प्रमुख उपस्थिती सौ.गौरी वनारसे वायचळ (महाराष्ट्रातील पहिली महिला उत्कृष्ठ संबळ वादक), विनीत चव्हाण (कलाकार,लागीर झालं जी फेम), स्नेहल भोपळे (मिसेस इंडिया), तेजश्री वाळवलकर (अभिनेत्री,उंच माझा झोका, फेम) व मान्यवरांची विशेष उपस्थिती होती. कार्यक्रमाचे विशेष सहकार्य पोलीस तपास क्राईम रिपोर्टर महाराष्ट्र राज्य सीनियर (महाराष्ट्र पोलीस बॉईज संघटना पुणे शहर अध्यक्ष), तसेच युवा क्रांती फाउंडेशन अंतर्गत पोलीस मित्र,ग्राहक, माहिती अधिकार व पत्रकार संरक्षण अधिकार संघटनेच्या विविध पदाधिकारी,सदस्य यांचा या दहीहंडी कार्यक्रमात विशेष सहभाग दिसून आला. या महिला दहीहंडी चे आयोजक सुरज (सोनू) वाळुंज मित्रपरिवार यांनी केले होते,असे ग्रामीण वार्ता पत्र न्यूज चे उप संपादिका अश्विनी ताई बोने यांनी सांगितले. दहीहंडी साजरी करताना समाजामध्ये सलोखा आणि पावित्र राखले गेले पाहिजे आणि आपली संस्कृती जपली गेली पाहिजे. आज सर्वच क्षेत्रात महिला प्राधान्याने आघाडीवर आहेत. त्यामुळे या आगळ्यावेगळ्या दहीहंडी उत्सवाला विशेष महत्त्व प्राप्त झाले असून दक्षिण पुण्यातील कात्रज मध्ये झालेल्या या दहीहंडी सोहळ्यासाठी मोठ्या संख्येने महिलांची उपस्थिती होती.



0 Comments