Advertisement

महर्षी वाल्मिकी संघाच्या मागणीला यश- अरविंद नाईकवाडी

 महर्षी वाल्मिकी संघाच्या मागणीला यश- अरविंद नाईकवाडी

मुजावर गल्ली येथील नजर इनामदार ते रशीद इनामदार नाईकवाडी कोळी बोळातील काँक्रेट रस्ता अंडरग्राउंड गटार काम चालू



मुख्य संपादक द्रोणाचार्य कोळी 

9822041174


मंगळवेढा : महर्षी वाल्मिकी संघाचे मंगळवेढा शहराध्यक्ष अरविंद नाईकवाडी यांच्यावतीने १४ ऑगस्ट रोजी मंगळवेढा नगरपरिषद कार्यालय समोर बेमुदत धरणे आंदोलन चालू करण्यात आले होते


मंगळवेढा शहर हद्दीतील मुजावर गल्लीत येथील नजीर इनामदार ते रशीद इनामदार व नाईकवाडी कोळी बोळामध्ये बसवण्यात आलेले पेव्हर ब्लॉक खराब झालेले असून तेथे येणे जाण्याचे चालू रस्त्यावर खड्डे पडलेले आहेत व पेव्हर ब्लॉक खराब झालेले आहे त्या खड्ड्यामध्ये पाणी साचून सदरच्या ठिकाणी घाण पसरत आहे तसेच तेथील खड्ड्यांमुळे सदर ठिकाणी राहत असलेले नागरिकांना त्याचा अडथळा निर्माण होत असून येणे जाणारे लोकांना व विशेष शाळेत जाणाऱ्या लहान मुलांना वयोवृद्ध नागरिक खड्ड्यामध्ये

अडकून पडले आहेत तरी सदरचे पेव्हर ब्लॉक काढून तेथील नजीर इनामदार ते रशीद इनामदार व नाईकवाडी कोळी बोळा मध्ये नवीन काँक्रिटीकरण व अंडरग्राउंड गटार मंजूर असून काम चालू करण्यासाठी  मंगळवेढा नगरपरिषद समोर बेमुदत धरणे आंदोलन करण्यात आले मंगळवेढा नगरपरिषद चे मुख्याधिकारी चरण कोल्हे साहेब यांनी लेखी आश्वासन दिले की १४/५/२०२५ रोजी लवकरात लवकर काम करण्यात येईल असे आश्वासन दिल्यानंतर महर्षी वाल्मिकी संघाचे अध्यक्ष अरविंद नाईकवाडी यांनी आंदोलन तात्पुरत स्थगित केले परंतु काही अधिकाऱ्यांनी जाणून- बुजून दुर्लक्ष केल्यामुळे काम लवकर चालू झालं नाही म्हणून महर्षी वाल्मिकी संघाचे मंगळवेढा शहर अध्यक्ष अरविंद नाईकवाडी यांनी पुन्हा बेमदत्त धरणे आंदोलन चालू केले दि.१४\८\२०२५ पासून मंगळवेढा नगरपालिकेसमोर बेमुदत धरणे आंदोलन चालू केले दिनांक १५\८\२०२५ रोजी आज आमच्या मागणीला यश आले आहे  मंगळवेढा शहर हद्दीतील मुजावर गल्ली येथील नजीर इनामदार ते रशीद इनामदार व नाईकवाडी कोळी बोळातील काँक्रीट  रस्ता व अंडरग्राउंड गटर  काम चालू झाले आहे हे यश माझ्या एकट्याचे नसून माझ्या सर्व सहकारी मित्रांचे आहे असे मत महर्षी वाल्मिकी संघाचे मंगळवेढा शहराध्यक्ष अरविंद नाईकवाडी यांनी सांगितले आहे.

Post a Comment

0 Comments