कासार सिरसी येथे पालकमंत्री शिवेंद्रसिंह भोसले यांच्या हस्ते विविध विकास कामांचा लोकार्पण सोहळा
मुख्य संपादक
द्रोणाचार्य कोळी
9822041174
निलंगा : आमदार अभिमन्यू पवार यांच्या पाठपुराव्यामुळे कासार सिरशीसह परिसरात राबवण्यात आलेल्या 156 कोटी रुपयांच्या विविध विकास कामापैकी शहरात साकारण्यात आलेल्या विकास कामांतर्गत शासकीय विश्रामगृह, सार्वजनिक बांधकाम भवन व शुद्ध पेयजल योजनेअंतर्गत पाणीपुरवठा योजनेचा शुभारंभ व शहरात विकासाचे केंद्रबिंदू समजल्या जाणाऱ्या बसस्थानक परिसरात सिमेंट काँक्रिटीकरणाचा
भूमिपूजन समारंभ जिल्ह्याचे पालकमंत्री माननीय नामदार शिवेंद्रसिंह भोसले यांच्या हस्ते अनेक मान्यवरांच्या उपस्थितीत करण्यात आला. व इतर कामे प्रगतीपथावर असल्याचे सांगण्यात आले. या उपक्रमाचे औचित्य साधत पालकमंत्री शिवेंद्रसिंह भोसले यांनी कासार सिरसी येथे जगत ज्योती महात्मा बसवेश्वरांचा अश्वारूढ पुतळा उभारण्याचे जाहीर आश्वासन दिले याप्रसंगी आमदार अभिमन्यू पवार यांचेसह अनेक मान्यवर उपस्थित होते.
कासार सिरसी शहरात राबवण्यात आलेल्या विकासकामांतर्गत पूर्णत्वास आलेल्या बांधकाम भवन विश्रामगृह व शुद्ध पेजल योजनेचा शुभारंभ जिल्ह्याचे पालकमंत्री शिवेंद्रसिंह भोसले यांच्या हस्ते करण्यात आले याप्रसंगी त्यांचे येथील ग्रामस्थांच्या वतीने सरपंच सौ ममता डोंबाळे यांच्या हस्ते सत्कार करण्यात आला. याप्रसंगी उपसरपंच वीरेश चिंचनसुरे, मंडल अध्यक्ष नाना धुमाळ, ज्ञानेश्वर वाकडे यांचे सह विवेक कोकणे धनराज होळकुंदे जिलानी बागवान कल्पना गायकवाड, कल्पना ढगिले,
मयूर गबुरे, भास्कर पाटील, यांचे सह बांधकाम अभियंत्या सौ. अनिता पाटील यांचे सह मोठ्या प्रमाणात नागरिकांची उपस्थिती होती.
सत्काराला उत्तर देताना पालकमंत्री शिवेंद्रसिंह भोसले यांनी आमदार अभिमन्यू पवार यांनी या भागात राबवलेल्या विकास कामांचा गौरव करत यापुढेही त्यांच्या विकास कामास शासन त्यांच्या पाठीशी उभे असल्याचे सांगून यासाठी त्यांना निधी कमी पडू देणार नसल्याचे आश्वासन दिले. आमदार पवार म्हणाले की कासार सिरशीचा हा भाग राज्याच्या सीमा भागात आहे या भागात लिंगायत समाज मोठ्या संख्येने आहे त्यांच्या भावनेची जाणीव ठेवत आमदार पवार यांनी जनतेला कासार सिरशी शहरात जगत ज्योती महात्मा बसवेश्वरांचा अश्वारूढ पुतळा उभारण्याचे आश्वासन दिले होते याची पूर्तता लवकरच करण्यात येईल व महात्मा बसवेश्वरांच्या पुतळ्याचे अनावरण राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्रजी फडवणीस यांच्या हस्ते करण्यात येईल असे आश्वासन दिले. आता यापुढे कासार सिरशी सरपंच पदाची निवड न होता ती नगरपंचायत अध्यक्षांच्या निवडीचे संकेत देत लवकरच कासार सिरसीला तालुक्याचा दर्जा देण्यात येणार असल्याचे सांगितले.
0 Comments