जनकल्याण दिव्यांग पुनर्वसन केंद्रात महाराष्ट्र स्थापना दिन व जागतिक कामगार दिन साजरा
मुख्य संपादक द्रोणाचार्य कोळी
9822041174
निलंगा : किल्लारी पासून जवळच असलेल्या जनकल्याण दिव्यांग पुनर्वसन केंद्र नदी हत्तरगा ( ता. निलंगा ) येथे गुरुवारी ( ता. १ ) येथे महाराष्ट्र स्थापना दिन व जागतिक कामगार दिनानिमित्त स्थानिक व्यवस्थापन समिती सदस्य विश्वनाथजी गुंजोटे यांच्या हस्ते ध्वजारोहण करण्यात आले.
याप्रसंगी स्थानिक व्यवस्थापन समिती सदस्य युवराज वाडीकर, नागनाथ शेटकार, रामेश्वर बाळापुरे, हरीश जाधव, व्यवस्थापक श्रीराम शिंदे, संस्थेतील शिक्षक शंकर सुरवसे, शिक्षिका दिपाली देशपांडे, कर्मचारी ज्ञानेश्वर खोबरे, भीमराव विभूते, नामदेव फरताडे, अश्विनी फरताडे, श्रीमती सुजाता कांबळेसह विध्यार्थी, ग्रामस्थ उपस्थित होते. ध्वजारोहणानंतर स्थानिक व्यवस्थापन समितीच्या बैठकीत शेतकरी मार्गदर्शन शिबिर महिला संघटन अशा विविध विषयावर चर्चा झाली.
0 Comments