Hot Posts

6/recent/ticker-posts

किल्लारीत माजी विद्यार्थ्यांचा स्नेह मेळावा 


मुख्य संपादक द्रोणाचार्य कोळी 

9822041174

मो

किल्लारी : शिक्षकांच्या खाल्ल्या छड्या, घेवून मित्रांचा कळवळा, हात थरथरले तरी हृदयात मात्र आनंदसोहळा, गवसला सूर जगण्याचा इथेच आगळा, चिमुकल्या पंखांना बळ देणारी माझी प्रिय शाळा म्हणत रविवारी दिनांक 5 मे रोजी महाराष्ट्र माध्यमिक व उच्च माध्यमिक विद्यालय किल्लारी येथे माजी विद्यार्थ्यांनी मेळावा घेतला. 

यावेळी रामदास जोडवे, अशोक उमाटे, सुधाकर बोरुळे, वामन  देशमुख, शिवाजी घोगे, संजय औंढे, सतीश भोसले, श्रीकांत सोनवणे, बाबासाहेब कुंभार, बाबुराव मुगळे, सुरेश उपरे, ज्योती सोनवणे, राम कुलकर्णी यांची प्रमुख उपस्थिती होती.  

सण २००१-०२ मधील इयत्ता १० च्या माजी विद्यार्थी व गुरुजनांच्या स्नेहमेळाव्यात सकाळी ९ ते सायं ४ वाजेपर्यंत माजी विद्यार्थांनी शाळा भरबली. सर्वांनी तेंव्हा एकत्र बसून खाल्लेले डबे, निकालाच्या दिवसाची भीती, हातावर खाल्लेल्या छड्या, मैदानावर खेळलेले खो खो, कबड्डीचे डाव, मन पिळवटून टाकणारा तो शेवटचा दिवस आणि आता उरलेल्या त्या गोड आठवणी जाग्या केल्याचे विध्यार्थ्यांनी सांगितले. यावेळी माजी विध्यार्थी, शिक्षक, कर्मचारी उपस्थित होते.



Post a Comment

0 Comments