Hot Posts

6/recent/ticker-posts

ज्ञानसंस्कार सेवाभावी संस्थेच्या वतीने कासार शिरशीत पानपोईचा शुभारंभ

 ज्ञानसंस्कार सेवाभावी संस्थेच्या वतीने कासार शिरशीत पानपोईचा शुभारंभ



मुख्य संपादक द्रोणाचार्य कोळी 

9822041174


कासार शिरसी:  येथील ज्ञानसंस्कार बहुउद्देशीय सेवाभावी संस्थेच्या वतीने गुरुवार दिनांक 17 एप्रिल रोजी येथील बसस्थानकात प्रवाशांसह रोज बाहेरगावाहून शहरात येणाऱ्या प्रवाशांसाठी या संस्थेच्या वतीने शुद्ध पिण्याचे थंड पाणी उपलब्ध करून देण्यात आले.याचा शुभारंभ अनेक मान्यवरांच्या उपस्थितीत करण्यात आला.या स्तुत्य उपक्रमाबाबत शहरवासीयांसह प्रवासी वर्गातून समाधान व्यक्त करण्यात येत आहे.

कासार शिरसी येथील गेली पंधरा वर्षापासून कार्यरत असलेली ही सेवाभावी संस्था असून या अंतर्गत ती शैक्षणिक उपक्रमात अग्रेसर आहे या संस्थेच्या वतीने वृक्षारोपण योगा आरोग्य शिबिरांची ही आयोजन करण्यात येत असते.

सध्या तीव्र उन्हाची चाहूल लागली असून पाण्यासाठी नागरिकांची भटकंती चालू आहे यासाठी शहरात येणाऱ्या नागरिकांसाठी अत्यंत शुद्ध आणि थंडगार पाणी येथील बसस्थानकात उपलब्ध करण्यात आले आहे. या उपक्रमाचा शुभारंभ या संस्थेचे प्रमुख सर्वश्री प्रशांत स्वामी व धनराज होळकुंदे यांच्या शुभहस्ते करण्यात आला याप्रसंगी अनंत महामुनी,प्रेमनाथ रोहिले यांचे सह संदीप सूर्यवंशी, दौलु मडोळे ,रामदास बिराजदार व सोमनाथ मार्कड यांची उपस्थिती होती.उपक्रमाबाबत ज्येष्ठ नागरिकांत मात्र समाधान व्यक्त करण्यात येत आहे.

Post a Comment

0 Comments