कासार सिरसी येथे मोफत नेत्र तपासणी व मोतीबिंदू शस्त्रक्रिया शिबिराचे आयोजन
मुख्य संपादक द्रोणाचार्य कोळी
9822041174
निलंगा : कासार शिरसी येथील जैन समाजाचे थोर श्रावक कै. मतीसागर भाऊराव पाटील यांच्या स्मरणार्थ गुरुवार दिनांक २० फेब्रुवारी रोजी येथील देवी मंदिरामध्ये मोफत नेत्र शस्त्रक्रिया शिबिराचे आयोजन करण्यात आले आहे.याचा लाभ गरजूंनी घ्यावा असे आवाहन करण्यात आले आहे.
येथील सामाजिक कार्यकर्ते व सेवानिवृत्त शिक्षक मतिसागर पाटील यांच्या स्मृती प्रित्यर्थ उदगीर येथील लॉयन्स हॉस्पिटल व पाटील परिवाराच्या संयुक्त विद्यमाने आयोजित करण्यात आलेल्या या शिबिरात तज्ञ डॉक्टरांच्या उपस्थितीत या भागातील गरजूंसाठी आयोजनात आलेल्या या शिबिरात डोळ्याला कमी दिसणे पाणी येणे, तिरळेपणा यासह मोतीबिंदू शस्त्रक्रिया व उपचार करण्यात येणार असून गरजूंनी येताना स्वतःचे आधार कार्ड व आवश्यक ती कागदपत्रे घेऊन यावे.लेन्स बसवण्यासाठी पंधराशे रुपये खर्च अपेक्षित असून गरजूंना उदगीरला नेणे आणणे यासह निवास भोजन विनामूल्य करण्यात येईल अशी माहिती आयोजक महावीर सूर्यकांत पाटील यांनी दिली असून याचा लाभ घेण्यात यावा असे आवाहन करण्यात येत आहे.
0 Comments