निलंगा तालुका अंतर्गत अंगणवाडी सेविका मदतनीस पद भरतीला सुरुवात
मुख्य संपादक द्रोणाचार्य कोळी
9420010756
निलंगा : (दि.५ फेब्रु.) एकात्मिक बाल विकास प्रकल्प योजना निलंगा अंतर्गत सेविका & मदतनीस ची एकूण 68 पदे रिक्त आहे. सदर रिक्त पदासाठी शासन निर्णय महिला व बालविकास विभाग दिनांक 30 जानेवारी 2025 नुसार भरती प्रक्रिया काढण्यात आलेली आहे. ज्या गावात रिक्त जागा आहे. त्या गावातील अंगणवाडी केंद्र व ग्रामपंचायत येथे सदर जाहिरात लावण्यात आलेली आहे. संबंधित गावातील पात्र महिला यांना एकात्मिक बाल विकास प्रकल्प कार्यालय निलंगा येथे अर्ज सादर करावा लागेल. *अर्ज सादर करण्याची मुदत ही 6 फेब्रुवारी 2025 ते 20 फेब्रुवारी 2025 अशी आहे.* पंचायत समिती निलंगा येथे लावण्यात आलेल्या जाहिरातीमध्ये भरती प्रक्रिया बाबत सविस्तर तपशील नमूद करण्यात आलेला आहे.
0 Comments